
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
.विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरणातून साजरा केला जागतिक संगणक साक्षरता दिन
आळंदी ..दि 2 रोजी श्री ज्ञानेश्वर विद्यालय व जुनिअर कॉलेजमध्ये ‘जागतिक संगणक साक्षरता दिन’ विद्यार्थ्यांनी उत्साहात पथनाट्य, भाषण ,कविता तसेच नाटिका द्वारे संगणक साक्षरतेचे महत्व विशद करून तसेच सायबर क्राईम व सायबर सिक्युरिटी या विषयावर उत्तम सादरीकरण सादर करुन साजरा केला. सदर कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप जी टिकले साहेब, समन्वयक शैल फाउंडेशन व संस्थापक प्रमुख सल्लागार कनेक्ट डॉट कन्सल्टन्सी अँड ट्रेनिंग यांनी संगणक कौशल्यावर पकड निर्माण करण्याची गरज विशद केली. तसेच प्रमुख पाहुणे यशवंत कासार साहेब (सी ए) व्हाईस चेअरमन दि कॉसमॉस को ऑफ बँक लि. पुणे यांनी संगणकाचे मानवी जीवनातील योगदान विशद केले. तसेच दैनिक चालू वार्ता पुणे चे संपादक ज्ञानेश्वर लोखंडे साहेब यांनी संगणक युगात संगणक साक्षरतेचे महत्व सांगितले. सुपर कॉम्प्युटरचे संचालक शंकरजी देवरे यांनी संगणकावर आधारित व्यवसायाची बदलती क्षेत्रे याबाबत मार्गदर्शन केले. संस्धाध्यक्ष सुरेश काका वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना ‘जागतिक संगणक साक्षरता दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या तर संस्था सचिव अजित वडगावकर यांनी संस्थेतील संगणक विभागाच्या कार्याचा आढावा घेऊन संगणक विभागास प्रोत्साहित केले तसेच विद्यार्थ्यांच्या विविध सादरीकरणाचे कौतुक केले.प्रशालेचे मुख्याध्यापक मुंगसे सूर्यकांत यांनी शाळेतील वाढत्या विद्यार्थी संख्येच्या दृष्टिकोनातून अधिक संगणक संचाची आवश्यकता आहे व त्याबद्दल पाहुण्यांकडे मागणी केली व लोकसहभाग याबाबत मार्गदर्शन केले. यांस प्रतिसाद म्हणून सुपर कॉम्प्युटर चे संचालक शंकरजी देवरे साहेबांनी प्रशालेस एक संगणक भेट रूपाने देऊ केला आहे.संगणक शिक्षिका स्वागती कदम यांनी प्रास्ताविक सादर केले. तर मोनिका जगताप यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे नियोजन संगणक समितीचे प्रमुख श्री अआल्हाट सोमनाथ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश मठपती सर ,अनिशा शिंदे व राधिका फपाळ या विद्यार्थिनीनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने व सांगता माऊलींच्या पसायदानाने झाली. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांची सादरीकरणाची तयारी संगणक सदस्यांनी करून घेतली होती तसेच संगणकावर आधारित रांगोळी सौ. सोनाली आवारी यांनी रेखाटली होती कार्यक्रमासाठी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री राठोड किसन व संगणक समिती पर्यवेक्षक सोनवणे प्रशांत व पडळकर अनिता उपस्थित होत्या. शेख अमीर, श्रीमती थोपटे छाया व संगणक शिक्षक शेख आय. एम.,शिक्षक प्रतिनिधी कुलकर्णी पी .डी .उपस्थित होते. तंत्रस्नेही शिक्षक होवाळ सर , दादासाहेब गायकवाड व कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण दाखविणारे श्री भागवत प्रकाश व सोनवणे राजू तसेच शिक्षकेतर प्रतिनिधी उमेश कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले.