
मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने शहीद हजरत टिपू सुलतान यांना अभिवादन.
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव
धाराशिव/भूम :-शहरात मुस्लिम एकता मध्यवर्ती कार्यालय येथे शहीद हजरत टिपू सुलतान यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मुस्लिम एकता संघटनेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक ,वक्तृत्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान शहीद हजरत टिपु सुलतान यांच्या प्रतिमेस एम आय एम तालुका अध्यक्ष यजाज काझी यांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. मुस्लिम एकता च्या वतीने विविध कार्यक्रमाने सामाजिक सलोखा राखुन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भूम शहराचे ग्रामदैवत आलमप्रभु देवस्थान व सैलानी बाबा दर्गाह येथुन कार्यक्रमाची सांगता झाली.
मुकबधिर शाळेत मुला-मुलींना व शिक्षकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली व तसेच उर्दू प्राथमिक शाळेत शहीद हजरत टिपु सुलतान यांच्यावर वक्तृत्व स्पर्धा घेऊन उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले व उर्दू शाळेत मुला-मुलींना शालेय साहित्य वाटप व फळ वाटप करण्यात आले. शेवटी भूम पोलीस स्टेशन येथे शेरनी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
दरम्यान शहरातील सर्व पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी भविष्यात डीजेचे कधीही समर्थन करणार नाही असा ठराव संघटनेने घेतला व यापुढे भविष्यात विविध सामाजिक सलोखा, वक्तृत्व स्पर्धा,सामाजिक जनजागृती करूनच शहीद हजरत टिपु सुलतान यांची जयंती साजरी करणार असल्याचे सांगितले.
यावेळी गौस शेख, जफर पठाण, कलीम पठाण, मकसुद मोगल,फिरोज पठाण पैलवान अखिलेश जमादार, हैदर जमादार आदी उपस्थित होते.