
भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम गोलाई चौकात विजयोत्सव
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव
धाराशिव/भू म:-महाराष्ट्रत भारतीय जनता पार्टी -शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने भूम गोलाई चौकात विजयोत्सव,आनंदोत्सव साजरा केला .
या निमित्ताने घोषणाबाजी करत लाडूतुला करण्यात आली, फटाके बाजी करण्यात आली, यावेळी भारतीय जनता पार्टीचे भूम शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, तालुका प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत गवळी, विधीज्ञ संजय शाळू, युवक तालुका अध्यक्ष गणेश भोगिल, सुग्रीव शिंदे वाल्हा, लक्ष्मण बोराडे , सिद्धार्थ जाधव, आकाश शेटे, संदीप खामकर , आध्यात्मिक आघाडी तालुकाअध्यक्ष योगेश आसलकर, शुभम खामकर, यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.