पाहा किती आहेत फायदे..!
काही काळापूर्वी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या किमती वाढवल्या आहेत. कंपन्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ अपडेट केला आणि त्यांच्या टॅरिफ प्लॅनचे दर वाढवले.
यामुळे युजर्स चांगलेच संतापले कारण आता त्यांना रिचार्ज करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. परंतु, जर तुम्ही Jio यूझर्स असाल आणि कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन शोधत असाल, तर एक प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा आहे. जो तुम्हाला कमी किमतीत चांगली सेवा देतो. चला Jio च्या या प्लॅनविषयी जाणून घेऊया.
कमी किंमतीत जास्त व्हॅलिडिटी असणारा प्लॅन
Jio त्याच्या यूझर्सना वेगवेगळ्या किंमतींच्या श्रेणींमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते. जे वेगवेगळ्या फायद्यांसह येतात. तुम्ही जिओच्या पोर्टफोलिओवर बारकाईने नजर टाकली तर तुम्हाला 1899 रुपयांचा प्लॅन मिळेल. हा प्लॅन तुम्हाला जिओच्या वेबसाइटवरील व्हॅल्यू सेक्शनमध्ये मिळेल. या प्लॅनमध्ये युजर्सना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान अनलिमिटेड कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके कॉल करू शकाल.
डेटा आणि SMS
या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 24 GB डेटा मिळतो. जो तुम्ही इंटरनेट वापरण्यासाठी वापरू शकता. मात्र, डेटा संपल्यानंतर तुम्ही पुन्हा रिचार्ज करू शकता. तसेच, यूझर्सना या प्लॅन अंतर्गत 3600 टेक्स्ट मेसेज पाठवण्याची सुविधा मिळते. याशिवाय यूजर्सना या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.
हा प्लॅन अशा यूझर्ससाठी सर्वोत्तम आहे ज्यांना कमी किंमतीत अधिक व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा आहे किंवा ज्यांना जास्त डेटाची आवश्यकता नाही. तुम्ही Jio ची वेबसाइट, MyJio ॲप आणि ऑनलाइन पेमेंट ॲप्सद्वारे प्लॅन रिचार्ज करू शकता.
