पंकजा मुंडे म्हणाल्या,महालक्ष्मीची इच्छा नाही मी उत्तर द्यावं
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी या विषयावर सगळ्यात पहिली मागणी कोणी केली असेल की, एसआयटी लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावरुन मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी.
त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे.
आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्हीही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता. देशमुख माझ्यावर काम करत होता. चांगला सरपंच म्हणून त्याने काम केलेले आहे. त्याच्या घरच्यांना न्याय देतील असा माझा विश्वास आहे.
यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्याबाबच प्रश्न विचारताच मंदिराच्या माईकवर सूचना झाल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, महालक्ष्मीची इच्छा नाही मी उत्तर द्यावं. विधानभवनाच्या प्रांगणामध्ये बोललेली आहे. योग्य न्याय करायची भूमिका मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यांच्यावर आमचा संपूर्ण विश्वास आहे. ते योग्य न्याय करतील. त्यामुळे मी गुन्हेगार कोण आहे हे सांगू शकत नाही. हे फक्त यंत्रणा सांगू शकते. असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
