601 रुपयांमध्ये वर्षभर मिळेल डेटा, पहा नेमका प्लॅन काय..?
तुमच्याकडेही रिलायन्स जिओ नंबर असेल आणि तुम्हाला कमी किमतीत अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घ्यायचा असेल, तर मुकेश अंबानींची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने यूजर्ससाठी एक शानदार प्लान लॉन्च केला आहे.
Jio च्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 601 रुपये आहे, तुम्ही हा प्लान स्वतःसाठी खरेदी करू शकता किंवा कोणालाही भेट देऊ शकता.
हा प्लॅन अनलिमिटेड डेटासह येतो पण हा प्लॅन खरेदी करण्यासाठी एक अट आहे, ती अट काय आहे आणि 601 रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतील आणि या प्लॅनची व्हॅलिडिटी काय आहे? चला जाणून घेऊया.
या आहेत अटी
तुम्हाला 601 रुपयांमध्ये अनलिमिटेड 5G डेटा मिळेल पण तुमच्याकडे आधीपासून Jio रिचार्ज प्लॅन असावा. हा साधासुधा प्लॅन नाहीये 601 रुपयांच्या अनलिमिटेड डेटासाठी, तुमच्या नंबरवर आधीच दररोज किमान 1.5 GB डेटा असलेला प्लॅन असावा.
याचा अर्थ असा की, 199 रुपये, 239 रुपये, 299 रुपये आणि त्यावरील ज्या प्लॅन्समध्ये दररोज 1.5 GB डेटा किंवा जास्त डेटा असतो. त्या सर्व प्लॅन्ससह तुम्ही 601 रुपयांच्या प्लॅनचा फायदा घेऊ शकता.
लक्षात घ्या की, तुमच्या नंबरवर दररोज 1 GB डेटा असलेला प्लॅन चालू असेल किंवा तुम्हाला 1899 रुपयांचा वार्षिक प्लान घ्यायचा असेल, तर तुम्हाला 601 रुपयांच्या प्लॅनचे फायदे मिळू शकणार नाहीत.
प्लॅन खरेदी केल्यानंतर तुम्हाला असे फायदे मिळतील
601 रुपयांचा प्लॅन खरेदी केल्यानंतर, तुम्हाला 12 अपग्रेड व्हाउचर मिळतील. जे तुम्ही एक-एक करून रिडीम करू शकता. हे व्हाउचर तुम्हाला My Jio ॲपमध्ये दिसतील. व्हाउचर रिडीम केल्यानंतर, तुम्ही अनलिमिटेड 5G डेटाचा आनंद घेऊ शकाल.
व्हाउचरची कमाल व्हॅलिडिटी केवळ 30 दिवसांची आहे. उदाहरणार्थ, समजा तुमच्या बेस प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी असेल, तर व्हाउचर देखील फक्त 28 दिवसांसाठी अॅक्टिव्ह राहील, त्यानंतर तुम्हाला दुसरे व्हाउचर अॅक्टिव्हेट करावे लागेल.
