
महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांच्या निशाण्यावर असलेला मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड लवकरच पोलिसांना शरण येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आता या प्रकरणी एक अपडेट समोर येत असून खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंधित असलेल्या एका महिलेला लवकरच अटक केली जाणार, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये बीडमध्ये जवळपास सीआयडीच्या नऊ टीम कार्यरत आहेत. टीममध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व टीमने सुमारे 100 हून अधिक लोकांची या प्रकरणांमध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे. रविवारी वाल्मिक कराड यांच्या निकटवर्तीय महिलेची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ही महिला कोण? अशा चर्चांना उधाण आले होते. वाल्मिक कराड पोलीसांच्या हाती लागत नसला तरी त्याच्या निकवर्तीय महिलेला पोलिस अटक करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ती महिला धाराशिवची
धाराशिव जिल्यातील ही महिला नाव असून ती वाल्मिक कराड यांच्याशी निकटवर्तीय असल्याचा संशय आहे. या अगोदर धाराशिव जिल्यातील कळंब शहरातील महिलेचा गुन्ह्यात वापर करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केला होता. त्यामुळे महिलेला पोलीस लवकर अटक करण्याची माहिती आहे. या अगोदर या महिलेचा खोट्या विनयभंगच्या तक्रारीसाठी वापर केल्याचा आरोप होताय या महिलेला अटक केल्यास एकूण या प्रकरणात दोन महिलांचा संबंध खुनाशी असल्याचा माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
150 सीआयडीचे कर्मचारी सक्रिय
वाल्मिक कराड लवकरच आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराड याचे बँक खाते सुद्धा गोठवले आहे. वाल्मिक कराड यांच्या पुढे केवळ आत्मसमर्पणचा पर्याय आहे. वाल्मीक कराड यांच्याकडे पासपोर्ट नाही. त्यामुळे देशातून पळूनही जाता येणार नाही. दीडशे सीआयडीचे कर्मचारी सक्रिय आहे. नऊ पथक देशभरात शोध करत आहे.