
नितेश राणेंच्या वक्तव्यावरून राजकारण तापलं
केरळ हे मीनी पाकिस्तान आहे, म्हणूनच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी विजयी होतात, ते लोक यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, असे म्हणत भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी वातावरण चांगलचं तापवून दिले आहे.
नितेश राणे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपसह आणि नितेश राणे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टिका करण्यात येत आहे. नितेश राणे याआधीही द्वेषपुर्ण भाषणांमध्ये अडचणीत ठरले आहे. त्यात आता या विधानाची भर पडली आहे.
रविवारी पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी महाराष्ट्र पोलिसांनी आयोजकांना कोणतेही प्रक्षोभक भाषण होणार नाही. याची काळजी घेण्यास सांगितले होते. मात्र तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून देशातील एक प्रगत राज्य म्हणून केरळचा नामोल्लेख केला जातो. केरळचा साक्षरता दर 96.2% आहे. अश्या केरळ राज्याला नितेश राणे मिनी पाकिस्तान बोलतात. यावरून त्यांची वैचारिक पातळी समजून येते असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी भाजपवर जोरदार टिका केली आहे.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे मंत्री असं वक्तव्य करत असतील, ते आपल्या राज्याचे हे दुर्दैव आहे. जेवढी शारीरिक उंची तेवढीच यांची वैचारिक उंचीही आहे. यावरून स्पष्ट होतं. नितेश राणे यांच्या सारखे लोकांच्या मुळे राज्याची इज्जत धुळीत मिळत आहे . या असल्या विधानासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री केलं आहे. त्यामुळे ते नितेश राणेंवर कारवाई करणार का? हे देखील त्यांनी सांगावं. केरळ राज्याला पाकिस्तानची उपमा देणाऱ्या नितेश राणेंचा जाहीर निषेध..