संतोष देखमुख हत्या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली. तीन पैकी दोन आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आहेत. मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला पोलिसांनी अटक केली आहे. तर सिद्धार्थ सोनवणेला मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणारा आणखी एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पोलिसांकडून याची कसून चौकशी सुरू आहे.
हत्येच्या तब्बल 25 दिवसांनंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात थोड्याच वेळात बीड पोलीस पत्रकार परिषद घेणार आहेत. अजूनही एक आरोपी फरार आहे. संतोष देखमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी वाल्मिक कराड अटकेत आहे तर सुदर्शन घुलेलाही अटक करण्यात आली आहे.
सुदर्शन घुले कोण आहे?
सुदर्शन घुलेचं वय 26 वर्ष आहे. मगाली 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल झालेत, मारहाण, चोरी, अपहरण, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न आणि फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल आहेत.
सुधीर सांगळे कोण आहे?
सुधीर सांगळेचं वय 22 वर्ष आहे. खुनातील सहभागाचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आला. आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला.
वाल्मिक कराडवर 302 चा गुन्हा अद्याप का दाखल नाही, धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी मी राजीनामा का देऊ अशी प्रतिक्रिया दिली होती. माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
वाल्मिक कराड कोणआहे?
परळी शहराजवळील पांगरी गावातील रहिवासी.. ग्रामपंचायत ताब्यात मुलगा सुशील कराड सरपंच आहे..
धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय.. जिवलग मित्र
धनंजय मुंडे भाजप मधून राष्ट्रवादी मध्ये आल्यापासून ते सोबती..
परळी मधल्या प्रत्येक राष्ट्रवादीच्या घडामोडी मध्ये वाल्मिक कराड यांचा सहभाग..
धनंजय मुंडे यांच्या 2019 आणि 2024 च्या निवडणुकीची जबाबदारी खांद्यावर.
धनंजय मुंडे यांच्या परळी येथील निवासस्थानी ऑफिसची संपूर्ण जबाबदारी वाल्मीक कराड यांच्याकडे..
परळी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या ताब्यात असताना गटनेते म्हणुन पाच वर्ष काम पहिले..
धनंजय मुंडे यांचा सर्व आर्थिक व्यवहार वाल्मीक कराड पाहतात..
धनंजय मुंडे यांचे अमित शहा म्हणून वाल्मीक कराड यांची ओळख आहे..
नाथ प्रतिष्ठानच्या गणेश उत्सवाचे संपूर्ण जबाबदारी वाल्मीक कराड यांच्यावर होती
परळी मध्ये झालेले सर्व राजकीय कार्यक्रम त्याच्या स्टेज उभारणीपासून संपूर्ण नियोजन वाल्मीक कराड..
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना जिल्ह्यातील सर्व प्रशासनाची धुरा वाल्मीक कराड यांच्या कडे होती.
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या प्रचाराची दूर आहे व यंत्रणेची धुरा ही वाल्मीक कराड यांनी सांभाळले.
तर 2024 च्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांचे संपूर्ण निवडणुकीची यंत्रणा वाल्मीक कराड यांच्याच खांद्यावर होती..
संतोष देशमुख यांच्या हत्यानंतर केज पोलीस ठाण्यात पंवचक्की कंपनीकडून 2 कोटीची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.. यात ते आरोपी आहेत..
