मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी परभणीत आज मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
सरकार आम्हाला न्याय आणि सुरक्षा द्यावी, नाहीतर शस्त्र परवाने द्या. आरोपी वाल्मिक कराडवर खुनाची कलमे लावून त्याला मोक्का का लावल्या गेला नाही? यासह विविध प्रश्नांवरुन परभणीच्या चौकात पोस्टरबाजी. दरम्यान पुणे सातारा महामार्गावरील कात्रज घाटातल्या जुन्या बोगद्याच्या आतील भागातील प्लास्टरचा काही भाग कोसळला. बोगद्याच्या वरील भागात केलेला प्लास्टरचा काही भाग वीटांसह कोसळला. सुदैवाने यावेळी याठिकाणी वाहन नसल्यानं दुर्घटना टळली. सकाळी 6 ते 7 वाजताच्या दरम्यान घटली घटना.
