
सिडनीला कसोटीला टी-ट्वेंटीची फोडणी
सिडनी कसोटीमध्ये टीम इंडियाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याने धमाकेदार खेळी केली. मागील चार कसोटी सामन्यात फेल ठरलेल्या ऋषभने पाचव्या कसोटीत आपल्या फलंदाजीची जादू दाखवली.
चार कसोटीत फेल ठरल्यानंतर ऋषभला गौतम गंभीरने त्याला चांगलंच झापलं होतं, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली होती. अशातच पहिल्या डावात संयमी खेळी करणाऱ्या ऋषभने दुसऱ्या डावात टी-ट्वेंटीची फोडणी दिली अन् 184 च्या स्ट्राईक रेटने आक्रमक खेळी केली.
सिडनी कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंत 33 बॉलमध्ये 61 धावा करून बाद झाला होता. 61 धावांच्या खेळीत 6 फोर आणि 4 सिक्स मारण्यात पंतला यश आलं. ऋषभने आपल्याच अंदाजात सुरूवात केली. पहिल्याच बॉलवर सिक्स मारत ऋषभने ऑस्ट्रेलियाला स्पष्ट संकेत दिले होते. त्यानंतर ऋषभने आक्रमक अंदाजात 29 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियात कसोटीमध्ये सर्वाधिक जलद फिफ्टी ठोकणारा ऋषभ पहिला फलंदाज ठकला आहे.
चांगली सुरूवात मिळून देखील ऋषभ पंत 61 धावांवर बाद झाला असला तरी या ऋषभ पंतने हेड कोच गौतम गंभीर यांचा खास विक्रम मोडीत काढला आहे. पंतने आतापर्यंत भारताबाहेर 29 कसोटी सामने खेळले असून 1842 धावा केल्या आहेत, ज्यात 4 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे. तर हेड कोच आणि माजी खेळाडू, गौतम गंभीरने भारताबाहेर कसोटीत एकूण 24 सामने खेळले आणि या काळात तो 1832 धावा करण्यात यशस्वी ठरला.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), सॅम कॉन्स्टास, उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रेव्हिस हेड, ब्यू वेब्स्टर, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.