
संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनवीन धागेदोरे समोर येत आहेत. त्यात भापज आमदार सुरेस धस यांच्या आरोपांची मालिका देखील सूरूच आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरच खंडणीची डील झाल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता.त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या झाली होती.
त्यामुळे सुरेश धसांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.या सर्व घडामोडीनंतर आता माझं हदय सांगतंय, धनंजय मुंडें यांचा हत्या प्रकरणात हात नसेल, असं मोठं विधान सुरेश धस यांनी केलं आहे.त्यांच्या या विधानाने खळबळ माजली आहे.
भाजप आमदार सुरेस धस यांची टीव्ही 9 वर मुलाखत पार पडली आहे. या मुलाखतीत धसांनी हे मोठं विधान केलं आहे. आकाचे (वाल्मिक कराड) आका (धनंजय मुंडे) खंडणीच्या बैठकीत होते.पण संतोष देशमुख हत्या प्रकरणातल त्यांचा (धनंजय मुंडेंचा) हात असेल असं मला वाटतं नाही. कारण वसूली वगैरे हेच करायचे. त्यामुळे आता इतक्या लवकर त्यांचा हत्येत सहभाग असेल असं सांगता येत नाही,असे मोठं विधान सुरेश धस यांनी केले आहे.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, या हत्या प्रकरणात आका आहे. पण आकाचा आका याचं इतक्या लवकर नाव नाही घेणार. यासाठी थोड थांबाव लागेल. इतक्या लवकर त्यांना लगेच आरोपी ठरवणे योग्य नाही. परंतू राजीनामा मात्र त्यांनी दिला पाहिजे. हे माझं प्रामाणिक मतं आहे. त्यांना राजीनामा द्यायला अजित पवारांनी भाग पाडावं, असं मला वाटतं,अशी भूमिका देखील सुरेश धसांनी मांडली.
आकाच्या (वाल्मिक कराड) आकाने (धनंजय मुंडे) व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला जेलवारी झाली पाहिजे. पण मोठ्या आकाने (धनंजय मुंडे) व्हिडिओ पाहिला असेल असं मला वाटत नाही. माझं हदय सांगत धनंजय मुंडेंनी तो व्हिडिओ पाहिला असे मला वाटत नाही. पण आकाने शंभर टक्के पाहायला असेल, असे देखील सुरेश धसांनी स्पष्ट सांगितलं आहे.