
खून करताना आरोपी घेत होते मजा;SIT ने कोर्टात सगळं सांगितलं..!
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. संतोष देशुमखांची ज्याप्रकारे संतोष देशमुखांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
कारण सरपंचांची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती, त्यांच्यावर 156 वार करण्यात आले होते. जवळपास 56 वार तसेच दीड लीटर रक्त साकळले होते. ही मारहाण करताना आरोपींनी व्हिडीओ बनवला होता, तो व्हिडीओ रिकव्हर करण्यात SIT ला यश आले आहे.
संतोष देशमुखांना मारहाण करतानाचा हा व्हिडीओ आहे. आरोपीच्या फोनमध्ये हे व्हिडीओ होते. या व्हिडीओमध्ये संतोष देशमुखांना आरोपी मारहाण करत होते आणि आनंद लुटत होते, असे एसआयटीने कोर्टात सांगितले आहे. या संदर्भातील सगळे पुरावे एसआयटीने कोर्टत सादर केले आहेत. संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना एके ठिकाणी नेऊन जबरदस्त मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. या आरोपींना संतोष देशमुख यांच्या हत्येचा अजिबात पश्चाताप नाही. संतोष देशमुख यांना मारहाण करताना आरोपींनी तो एन्जॉय केल्याचे कोर्टात एसआयटीने सांगितले आहे.ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले. त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाला होता. परंतु एसआयटीने ते पुरावा रिकव्हर केला आहे. मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा मिळवला आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिली शस्त्रांची माहिती
जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, विष्णू चाटे , सुदर्शन घुले , सुधीर सांगळेला अटक करण्यात आली. कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे. खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराडलाही अटक करण्यात आली. आरोपींकडून या हत्या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयासमोर हत्येच्या संदर्भातील शस्त्रांची माहिती दिली आहे.
संतोष देशमुखांची हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली?
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केले. तसेच न्यायालयाला संतोष देशमुखांच्या हत्या करताना कोणती शस्त्रे वापरली याची देखील माहिती देण्यात आली आहे. संतोष देशमुखांच्या अपहरणानंतर त्यांच्या हत्येसाठी आरोपींनी मारहाण करताना 41 इंचाचा एक गॅसचा पाईप ज्याची एक बाजू काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती. लोखंडी तारेचे 5 क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मूठ, एक लाकडी दांडा, तलवारीसारखं शस्त्र , चार लोखंडी रॉड आणि एक कोयता तसेत लोखंडी फायटर आणि धारधार कत्ती देखील वापरली होती.