
राजीनामा न घेण्याची 8 कारणं
बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंवर सातत्यानं निशाणा साधण्यात येत आहे. विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, याप्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून रंगली होती.
तसंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतचा निर्णय अजित पवारांनी राखून ठेवला असल्याचंही सूत्रांच्या माहितीकडून समोर आलं होतं. पण, अजूनही धनंजय मुंडेंबाबत अजित पवार यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकणानंतर बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी झाली आहे. त्यांचे विरोधक तर आहेतच पण मित्रपक्षाच्या आमदारांनी त्यांना चहूबाजूंनी घेरलंय. नैतिकतेच्या मुद्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. विरोधकांनी इतका दबाव वाढवूनही धनंजय मुंडेंना अजित पवार अभय का देत आहेत? अशा प्रश्न विचारला जातोय. पण त्याची काही कारणं आहेत.
...म्हणून धनंजय मुंडेंना अभय?
१. धनंजय मुंडेंच्या थेट सहभागाचा पुरावा नाही
२. धनंजय मुंडे अजित पवारांचे निकटवर्तीय
३.अजित पवार सिंचन प्रकरणात अडचणीत असताना मुंडेंची साथ
४. पहाटेच्या शपथविधीवेळी फडणवीस- दादामधला दुवा मुंडे
५. भुजबळांनंतर धनंजय मुंडे राष्ट्रवादीतला ओबीसी चेहरा
६. ओबीसी नाराज झाल्यास पक्षापासून दुरावण्याची भीती
७. भाजपसोबत जाण्यासाठी मुंडेंची महत्वाची भूमिका
८. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत घट्ट मैत्री
धनंजय मुंडे यांच्या या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्याविरोधात उठलेली आरोपांची राळ त्यांच्यासाठी आणि पक्षसाठीही अडचणीची ठरणारी आहे.
…म्हणून धनंजय मुंडे अडचणीत?
निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचे आरोप
संतोष देशमुख हत्येप्रकरणात वाल्मिक कराडवर आरोप
विरोधकांसह, मित्रपक्ष आणि स्वपक्षातील नेत्यांच्याही रडारवर
सुरेश धस यांच्या आरोपानंतर धनंजय मुंडे एकाकी
पक्षाची बदनामी होत असल्यानं दबाव वाढला
प्रकरण नीट न हाताळल्याने अजित पवार नाराज
परळीसह बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश, निकटवर्तीयांच्या भोवती आवळलेला कारवाईचा फास यामुळे धनंजय मुंडेही विरोधकांच्या रडावर आलेत. त्यांना त्यांचा राजीनामा हवा आहे. नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे राजीनामा देतात की त्यांना तो द्यायला लावला जावू शकतो हे पाहाणं महत्वाचं आहे. पण अजित पवार यांना पक्षाचे प्रमुख म्हणून हा निर्णय घेणं तितकं सोप्पं नाही हेही तितकंच खरं.