
‘ते’ नेते सीआयडी चौकशीच्या रडारवर
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी आणि एसआयटीकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहे. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड याच्याभोवती कारवाईचा फास आवळला जात आहे.
वाल्मिक कराडचे सरेंडर…
वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर 2024 रोजी पुण्यात शरण आला. सीआयडी मुख्यालयात सरेंडर होण्याआधी कराडचा व्हिडीओ समोर आला. त्यात त्याने आपण सीआयडीसमोर सरेंडर होत असल्याचे सांगितले. कराड हा सरेंडर होत असताना त्यावेळी त्याच्यासोबत दोन व्यक्त्ती आणि व्हाईट कलरची एसयूव्ही होती. ही एसयूव्ही कार आता सीआयडीने जप्त केली आहे.
कराडला साथ देणारे सीआयडी चौकशीच्या रडारवर…
सरेंडर होण्यासाठी वाल्मिक कराड हा सीआयडी मुख्यालयात आला तेव्हा त्याच्या कारमध्ये त्याचे समर्थक होते. परळीतील स्थानिक नगरसेवक, नेते, कार्यकर्ते कराडसोबत होते. सीआयडी मुख्यालयात आल्यावर कराडला लागलीच पोलिसांनी ताब्यात घेतले.
आता कराडसोबत सरेंडरच्या वेळी असणारे सीआयडीच्या रडावर आले आहेत. कारचा मालक शिवलिंग मोराळेसह अन्य मदत करणारे लोक देखील सीआयडीच्या रडारवर आहेत. सीआयडी त्यांचीदेखील कसून चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.