” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौलतनाना शितोळे यांना सर्व प्रस्ताव एक महिन्याच्या आत मंजूर करून देऊ असं आश्वासन दिलं आहे…”
पुणे ( शिरूर ) : शिरूर तालुक्यातले भूमिपुत्र महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे नेते व जय मल्हार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष तसेच जय मल्हार विकास आर्थिक महामंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी काल ( दि : 9 जानेवारी ) मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. व त्यांना शिरूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतच्या कामाचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये प्रामुख्याने मौजे शिंदोडी ग्रामपंचायत, मौजे मांडवणी ग्रामपंचायत व तसेच शिरूर मधील इतर गावालगतची सामाजिक दृष्ट्या महत्त्वाची असणारी कामे जसेकि रोडचे काम पाण्याचे काम, रोडचे काम , स्मशानभूमीतील रस्ते, महत्त्वाच्या चौकामधील सुधारणा , काही ग्रामपंचायत हद्दीतील शाळेत जाणारे रोड अशा विविध कामाच्या मागणीचा जवळपास 20 कोटीचा प्रस्ताव देवेंद्र फडणवीस यांनी एक महिन्याच्या आत मंजूर करूनं देऊ असं आश्वासन दौलत नाना शितोळे यांना दिलेला आहे. असं दौलतनाना दैनिक चालु वार्ताला बोलताना म्हणाले.
दौलत नाना शितोळे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध गेल्या चार ते पाच वर्षापासून मैत्रीपूर्ण आहेत. त्यामुळे शिरूर मधील विकास कामे घेऊन या तसेच महाराष्ट्रातील इतर ही कामे आपण घेऊन यावेत असं मुख्यमंत्री महोदय यांनी दौलत नाना शितोळे यांना आवर्जून बोलण्याचं दौलत नाना शितोळे यांनी दैनिक चालु वार्ताला बोलताना सांगितला आहे.
बहुजन समाजाचं एक खंबीर नेतृत्व म्हणून दौलत नाना शितोळे यांची ओळख पूर्ण महाराष्ट्राला आहे. त्यातच ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असल्यामुळे आणि विधानसभेसारख्या या मोठ्या रणसंग्रामामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असल्यामुळे आणि त्यांच्या भूमिकेचा महायुतीला फायदा झाल्यामुळे ते अधिकच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. दौलत नाना शितोळे यांनी विधानसभेमध्ये अनेक सभा घेतल्या त्यामध्ये जवळपास 52 आमदार जिंकले आहेत तेथे दौलत नाना शितोळे यांच्या सभा झालेल्या होत्या. महायुतीच्या विजयामध्ये दौलत नाना शितोळे यांचाही खरीचा वाटा असल्याचे बोललं जातं . थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांनी दौलतनाना शितोळे यांना महायुतीचा स्टार प्रचारक केले होते ते सत्कर्मी लागले असल्याचेही चर्चा पूर्ण शिरूर तालुक्यात व महाराष्ट्रातील लोकांमध्ये आहे.
प्रतिक्रिया :
येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजासाठी व इतर समाजासाठी शिरूर तालुका तसेच महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी आपल्या बहुजन समाजाला न्याय हक्कासाठी लढा देत असतानाच त्या भागातील विकासाची कामे मार्गी लागली पाहिजे हा माझा पूर्णपणे हेतू असणार आहे. आमचे नेते आमचे देवाभाऊ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा नक्की फायदा होईल आमची कामे सर्व मार्गी लागतील. आणि विविध विकास कामाला चालना मिळेल याची आम्हाला खात्री आहे.
दौलतनाना शितोळे…!!

