मानव अधिकार आयोगात गुन्हा दाखल
मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि त्यांच्या देहाची केलेली विटंबना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून या प्रकरणी खा.बजरंग सोनवणे यांनी केली
3 जानेवारी रोजी या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाने स्वतंत्रपणे चौकशी करावी, अशी मागणी आयोगाचे सदस्य प्रियांक क्रानूगनो यांची भेट घेऊन केली होती.
या प्रकरणात आयोगाने गुन्हा दाखल करून घेतला असून आता आयोगही स्वतंत्र चौकशी करणार आहे.
दि.9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाल्याचे समजल्यानंतर सर्वात पहिल्यांदा संतोष देशमुख यांचा जीव वाचावा, यासाठी खा. सोनवणे यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याशी संपर्क केला. दरम्यान, त्यांनी फोन घेणे टाळले. शिवाय केज पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही. या कालावधीत संतोष देशमुख यांचा मानसिक व शारीरिक छळ करुन हत्या झाली.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कारवाई करण्याचे अधिकार
घटनेच्या वेळी अथवा तपासात पोलिसांचे दुर्लक्ष झाले असल्यास राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसा अहवाल देते व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला याबाबत कारवाई करण्याचे अधिकार आहेत. आयोगाला न्यायिक व अर्धन्यायिक अधिकार आहेत. गुन्हा नोंद करुन घेऊन प्रकरणात गांभीर्याने कारवाई केल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी देशाच्या महामहिम राष्ट्रपती व राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे आभार मानले आहेत.
