
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. मुंबई दौऱ्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पणाचे विविध कार्यक्रम होणार आहेत. त्याचवेळी पीएम मोदी आज महायुतीच्या आमदारांशी संवाद साधणार आहेत.
दुसऱ्याबाजूला आज सुद्धा संतोष देशमुख हत्या प्रकरणात महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी सर्व आरोपींना मोक्का लावावा यासाठी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. काल वाल्मिक कराड समर्थकांनी परळी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. यावेळी काही समर्थकांनी वाल्मिक कराडच्या सुटकेच्या मागणीसाठी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. एका समर्थकाचा पेटवून घेण्याच्या प्रयत्नात पाय जळाला.