
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापल आहे. या हत्या प्रकरणावरून मराठा आणि ओबीसी नेते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे.
संतोष देशमुख यांच्या बंधूंनी पाण्याच्या टाकीवर चढून केलेल्या आंदोलनादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एका विशिष्ट समाजाबाबत केलेल्या टिपणीनंतर ओबीसी नेते आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत.
ओबीसी नेते मंगेश ससाणे आणि बाळासाहेब सानप यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला तसेच सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. मंगेश ससाने म्हणाले, गेल्या एक दिवस दीड वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे जातीय विष पेरत आहेत. काही दिवसापूर्वी त्यांनी एका विशिष्ट समाजाला घरात घुसून मारू अशा धमक्या दिल्या आहेत. त्यानंतर जरांगे यांच्या विरोधात महाराष्ट्रभर तक्रारी दाखल झाल्या आहेत. तरी देखील अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.
संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या बंधूंनी विविध मागण्यांसाठी पाण्याच्या टाकी वर चढून जेव्हा आंदोलन केले या आंदोलनादरम्यान जरांगे पाटील यांनी वंजारी समाजाबाबत अत्यंत आक्षेपार्य विधान केलं आहे. वंजारी समाज हा ओढा नाल्यातील पैदास आहे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करत असताना देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे त्यांना कायद्याचे संरक्षण दिलय का? असा सवाल मंगेश ससाने यांनी उपस्थित केला.
मनोज जरांगे पाटील यांच्यावर यापूर्वी देखील सात-आठ गुन्हे दाखल आहेत. तसंच आता देखील सात-आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असं असताना देखील त्यांना अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात येत नाही. त्यामुळे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अटक करण्यात यावी त्यांच्या मुस्क्या आवळण्यात याव्यात , त्यांना कायद्याचा पट्टा घातल्याशिवाय हा माणूस थांबणार नाही. अशी आमची मागणी सरकारकडे असल्याचे ससाणे म्हणाले.
तसेच लातूर मधील टाकळी या गावांमध्ये ऑनर किलिंगचा प्रकार घडला आहे. एका उच्च जातीच्या मुलीवर प्रेम केलं म्हणून तरुणाला घरी बोलून अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यामध्ये एकूण 15 आरोपी असून त्यातील आठ आरोपींना पकडण्यात आला आहे. मात्र बाकीच्या आरोपी अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे एका निर्गुण खुनाला वेगळा न्याय आणि दुसऱ्या ऑनर किलिंगला दुसरा न्याय न देता या प्रकरणात देखील एसआयटी नेमून हे प्रकरण सीआयडी कडे द्यावे आणि यातील सर्व आरोपींना मोक्का लावावा अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं ससाने म्हणाले.