
Champions Trophy पूर्वी घेणार हा मोठा निर्णय!
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे. यंदाचं चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद जरी पाकिस्तानकडे असलं तरी टीम इंडियाचे सामने हायब्रिड मॉडेलवर म्हणजे दुबईत होणार आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर मोठा वाद देखील उफाळला होता. अशातच आता रोहित शर्मा पाकिस्तानला जाणार का? असा सवाल विचारला जात आहे. त्याला कारण… चॅम्पियन्स ट्रॉफीचा कॅप्टन्स डे…
चॅम्पियन्स ट्रॉफीचा कॅप्टन्स डे
एखाद्या आयसीसी स्पर्धेपूर्वी सर्व संघांचे कर्णधार एका ठिकाणी जमतात आणि एक ग्रुप फोटो सेशन होते. यजमानपद ज्या संघाकडे असतं, त्या देशात फोटो सेशन होत असतं. अशातच आता यंदाचं फोटो सेशन पाकिस्तानमध्ये होणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच बीसीसीआयच्या सुत्रांनी मोठी माहिती दिली आहे.
रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये जाणार?
कॅप्टन्स डे साठी रोहित शर्माच्या पाकिस्तानमध्ये सहभागाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. प्रथम संघ जाहीर केला जाईल, त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असं बीसीसीआयच्या सुत्रांनी एएनआयला सांगितलं आहे.
भारत vs पाकिस्तान
दरम्यान, राजकीय तणावामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये अनेक दिवसांपासून द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळलेली नाही. दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेतच एकमेकांशी भिडतात. अशातच 23 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ दुबईमध्ये दोन हात करणार आहेत. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन्ही देशातील क्रिडाप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी गटविभागणी –
अ गट- पाकिस्तान, भारत, न्यूझीलंड, बांग्लादेश.
ब गट- दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वेळापत्रक (Champions Trophy 2025 Schedule)
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची.
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई.
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची.
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर.
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई .
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी.
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी.
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी.
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर.
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची.
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई.
4 मार्च – उपांत्य फेरी 1, दुबई.
5 मार्च – उपांत्य फेरी 2, लाहोर.
9 मार्च – अंतिम सामना, लाहोर/ दुबई.