
केज तालुक्यातील मस्साजोग या गावाचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्याप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री धनंजय मुंडे यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
यामुळे राज्याचे राजकीय वातावरण पेटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र सामनातून अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराडवर (Walmik Karad) निशाणा साधण्यात आला आहे. “अजित पवार यांच्या नैतिकतेची कमालच म्हणायला हवी. त्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बरखास्त करायला पाहिजे होते, पण अजित पवारांनी बीडची राष्ट्रवादी पक्षाची कार्यकारिणी बरखास्त केली आहे. हे केवळ ढोंग असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे.
बीडमध्ये बंदुकीचे राज्य होते. येथे अतीक अहमदपेक्षा भयंकर लोक राजकीय कृपेने धिंगाणा घालत आहेत. एका कराडला मोक्का लावून हा धिंगाणा कायमचा संपणार नाही. खरा नाग अजून बिळातच आहे, असा आरोप सामनातून केला आहे.
दरम्यान, सामानातून अजित पवार यांचे वाभाडे काढले आहेत. यावर आता अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर तपासाअंती वाल्मिक कराड याने धनंजय मुंडे यांचे नाव घेतले तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागू शकतो. तसेच त्यांची राजकीय कारकीर्द देखील नष्ट होऊ शकते.
Uddhav Thackeray criticizes Ajit Pawar
शिवाय, अजित पवार यांना मोठा धक्का बसू शकतो. परिणामी त्यांना सत्तेतून देखील बाजूला व्हावे लागू शकते. कारण मित्रपक्षाची बदनामी झाल्यानंतर त्यांना महायुतीत ठेवायचे की नाही याचा विचार नक्कीच केला जाईल, अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.