
800 रुपयांपेक्षा कमीमध्ये मिळतील हे फायदे
सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनने पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. खाजगी कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने त्यांचे रिचार्ज प्लॅन महाग केले असतील, पण BSNL अजूनही ग्राहकांना जुने आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन देत आहे.
BSNL ने आता आपल्या 9 कोटी यूझर्ससाठी असा रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्यामुळे Jio-Airtel आणि VI चे टेन्शन अनेक पटींनी वाढले आहे.
भारतीय संचार निगम लिमिटेड अर्थात BSNA ही उद्योगातील एकमेव कंपनी आहे. ज्यांच्याजवळ दीर्घ व्हॅलिडिटीसाठी जास्तीत जास्त प्लॅन आहेत. तुम्हाला बीएसएनएलच्या पोर्टफोलिओमध्ये 70 दिवस, 45 दिवस, 150 दिवस, 160 दिवस, 180 दिवस, 336 दिवस तसेच 365 दिवस आणि 425 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह इतर अनेक प्लॅन्स मिळू शकतात. BSNL ने आता 300 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आणून एक नवा धमाका केला आहे.
तुम्ही BSNL सिम वापरत असाल आणि तुम्हाला दीर्घ व्हॅलिडिटी प्लॅन घ्यायचा असेल, तर आता तुम्ही BSNL च्या 300 दिवसांच्या प्लॅनचा लाभ घेऊ शकता. आपण डिटेल्समध्ये कंपनीच्या या प्लॅनविषयी जाणून घेऊया.
BSNL लॉन्ग व्हॅलिडिटीसह स्वस्त प्लॅन आणत आहे
BSNL ने अलीकडेच आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी 797 रुपयांचा एक मस्त प्लॅन लिस्टमध्ये जोडला आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 300 दिवसांची दीर्घ व्हॅलिडिटी मिळते. म्हणजे, आता तुम्ही सरकारी कंपनीचे सिम कमी खर्चात 300 दिवस ॲक्टिव्ह ठेवू शकता. हा प्लॅन आणून BSNL ने दरमहिन्याला रिचार्ज करुन थकलेल्या करोडो ग्राहकांचा तणाव संपवला आहे.
BSNLच्या 797 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि डेटाची सुविधाही मिळते. रिचार्ज प्लॅनमध्ये, तुम्हाला रिचार्जच्या पहिल्या 60 दिवसांसाठी सर्व नेटवर्कसाठी अनलिमिटेड कॉलिंग दिले जाते. त्याचप्रमाणे, तुम्हाला पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा मिळतो. डेली डेटा मर्यादा संपल्यानंतर, तुम्ही 40Kbps च्या वेगाने इंटरनेट डेटा वापरण्यास सक्षम असाल. त्याचप्रमाणे, तुम्हाला पहिल्या 60 दिवसांसाठी दररोज 100 फ्री एसएमएस देखील मिळतात.
या यूझर्ससाठी हा सर्वोत्तम ऑप्शन आहे
BSNL चा हा रिचार्ज प्लॅन अशा यूझर्ससाठी सर्वात फायदेशीर आहे ज्यांना कमी खर्चात त्यांचे सिम दीर्घकाळ अॅक्टिव्ह ठेवायचे आहे. म्हणजे 60 दिवसांनंतरही तुम्ही कॉल करू शकणार नाही किंवा डेटा वापरू शकणार नाही, पण इनकमिंग कॉलची सुविधा सुरूच राहील. कॉल करण्यासाठी, तुम्हाला वेगळा टॉप अप प्लॅन घ्यावा लागेल