
दै चालु वार्ता प्रतिनिधी
वाशिम/रिसोड
भागवत घुगे
रिसोड मागील पंचवीस वर्षापूर्वी शासनाने कवडीमोल भावाने शेतकऱ्याची जमीन संपादन करून घेतली त्याचबरोबर कुटुंबातून शासकीय सेवेत सामावून घेऊ असे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात आले अशा शेतकऱ्यांना नोकरी नाही ना मोबदला नाही त्याच मध्ये प्रकल्पग्रस्तांचे वय मर्यादा असल्याने नोकरी मिळणे अशक्य असल्याने विविध मागण्यांचे वाशिम जिल्हाअधिकारी यांना दि १५रोजी बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी दिले निवेदन
जिल्ह्यातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त ची संख्या जास्त असून माननीय आयुक्त यांनी ३/४/२०२३ रोजी विभागातील प्रकल्पग्रस्तांच्या याद्या ऑनलाईन करण्याबाबत आदेश दिले आहेत तरीसुद्धा वाशिम जिल्ह्यातील अजून पर्यंत प्रकल्पग्रस्तांची यादी ऑनलाईन करण्यात आले नाही. संघटनेचा उपलब्ध करून देण्यात यावी
वयोमर्यादा संपुष्टात आलेले बेरोजगार प्रकल्पग्रस्त यांना त्यांच्या मर्जीप्रमाणे हस्तांतरित प्रमाणपत्र करून किंवा त्यांच्या येथे प्रमाणे प्रमाणपत्र जमा करण्यात यावे तसेच ने प्रकल्पग्रस्त बेरोजगार शासकीय सेवेत नोकरी करण्याची इच्छा नसून त्यांना सुद्धा शासनाने
एक रकमे रक्कम देऊन मोकळे करण्यात यावे
. या प्रकल्पग्रस्तांचे जमीन पूर्ण घेतली म्हणजे भूमिहीन झाले अशा प्रकल्पग्रस्तांना शासनाने प्रथम प्राधान्य देण्यात यावे जेणेकरून त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन तात्काळ उपलब्ध होईल. जिल्ह्यातले प्रकल्पग्रस्त जिल्ह्यातच सेवेत घेण्यात यावे. असे निवेदन देण्यात आले यावेळी
सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संजय धनाडे सरचिटणीस विजय चव्हाण रमेश राठोड सुधाकर पवार नितेश पवार गोविंद पवार अमोल विनोद पवार बद्रीनारायण घुगे दिलीप चौधरी यांच्या स्वाक्षऱ्या निवेदनात आहेत भरपूर प्रमाणात वाशिम जिल्ह्यातील सीसी बेरोजगार संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते