
मॉडेल नाही ना संत..!
उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे महाकुंभाला सुरूवात झाली आहे. या महाकुंभाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, या महाकुंभात चर्चेत आले ते दोन खास व्यक्ती…
एक म्हणजे संत हर्षा रिछारिया आणि दुसरे म्हणजे आयआयटी बाबा अभयसिंग… आपल्या सौंदर्यामुळे साध्वी हर्षा रिछारिया चर्चेत आली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तसेच तिच्या सौंदर्याची देखील चर्चा झाली. सोशल मीडियावर हर्षाचे फोलोवर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशातच आता हर्षावर अनेक संतांनी आक्षेप नोंदवला होता. महाकुंभात चेहऱ्याचं सौंदर्य नसतं, असं म्हणत ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी संताप व्यक्त केला होता.
साधू-संतांचा आक्षेप
अशातच आता साधू-संतांनी प्रश्न उपस्थित केल्याने हर्षा रिछारियाने महाकुंभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सांधू संतांनी प्रश्न उपस्थित केलेल्याने हर्षा रिछारिया भावुक झाल्याचं देखील पहायला मिळालं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि महाकुंभमेळ्यावरून परत येणार जाणार असल्याचं हर्षा रिछारियाने म्हटलं आहे. हर्ष रिचारियाने शांभवी पीठाधीशेश्वर आणि काली सेनेचे अध्यक्ष स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर टीका देखील केली.
मी मॉडेल किंवा संत नाही – हर्षा रिछारिया
मी मॉडेल किंवा संत नाही. मी फक्त अँकर आहे आणि मी आधी अभिनेत्री होते. स्त्री असून देखील संतांनी माझा अपमान केला. त्यामुळे आनंद स्वरूप यांना नक्कीच अपराधी वाटेल, असं हर्षा रिछारियाने म्हटलं आहे. प्रयागराजच्या महाकुंभ नगरमध्ये पेशवाईच्या रथावर विराजमान झाल्याने संतांनी आपेक्ष नोंदवला होता.
परमपूज्य गुरुदेव यांच्याकडून दीक्षा
मी एक सामान्य शिष्य आहे, जी माझ्या गुरुदेवांच्या सहवासात महाकुंभ जाणून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी तीर्थराज प्रयागराज येथे आले होते. मी परमपूज्य गुरुदेव यांच्याकडून दीक्षा घेतली आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की मी त्यांच्याकडून दीक्षा घेतलीये, असं हर्षा रिछारियाने म्हटलं आहे.
दोनच मुलं जन्माला घाला
दरम्यान, हर्षा रिछारिया एका वक्तव्यामुळे देखील चर्चेत आली होती. हर्षा रिछारियाला हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येबद्दल मत विचारलं असता ती म्हणाली की, तुम्हाला 10 मुलं आहेत की एक, तुम्ही मुलांवर कोणते संस्कार केलेत हे महत्त्वाचे आहे. दोनच मुलं जन्माला आली आणि त्यांचा धर्म आणि संस्कृतीशी संबंध आला तर ते देश आणि समाजाला पुढे नेतील, असं हर्षा म्हणाली होती.