
पुण्यात बनले आयकर आयुक्त..!
परळी वैजनाथयेथील भूमिपुत्र तथा छत्रपती संभाजी नगर आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विश्वास सोपानराव मुंडे यांची पदोन्नती होऊन आयकर आयुक्त, पुणे या पदावर नियुक्ती झाली आहे. मुंडे हे तालुक्यातील कन्हेरवाडीचे भूमिपुत्र आहेत.
आयआरएस विश्वास मुंडे यांचे शालेय शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कन्हेरवाडी येथे झाले व पदवी बीटेक केमीकलमध्ये रासायनिक अभियांत्रिकी नागपूर येथे झाली.
युपीएससीमध्ये देशात २२३ रँक प्राप्त करत भारतीय राजस्व सेवेत त्यांची नेमणूक झाली होती. दरम्यान, आता त्यांची आयकर आयुक्तपदी पदोन्नती झाली आहे. मुंडे यांनी सेवेत आल्यानंतर जळगाव, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, मुंबई येथे कर्तव्य पार पाडले तर आता ते पुणे येथे पुढील सेवा देणार आहेत.