
छ.संभाजीनगर : शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्याने संपूर्ण मराठवाड्यात परिचयाचे गंगाधर वानोळे यांना बीडच्या मातृभूमी प्रतिष्ठानने राजमाता जिजाऊ जयंतीदिनी सुप्रसिद्ध कीर्तनकार महंत राधाताई सानप, माजी ॲड.आमदार उषाताई दराडे आदी मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, धाराशिव, लातूर, परभणी, बीड या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन बीड, सातारा व जालना जिल्ह्यात वानोळे यांनी शैक्षणिक योगदान दिलेले आहे तर नांदेड, बीड व जालना जिल्ह्यात सामाजिक कार्य केले असून या कार्याने ते भोकर तालुका आदिवासी समाजाचे समन्वयक म्हणून मराठवाड्यात सुपरिचित आहेत.
त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर,मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, उपशिक्षणाधिकारी विपुल भागवत, गटशिक्षणाधिकारी एस.डी. शिंदे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी, गटशिक्षणाधिकारी अशोक सोळंके, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, गटशिक्षणाधिकारी भीमराव नांदुरकर, गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, गट समन्वयक के.जी.राठोड, उपसंचालक तुकाराम भिसे, आचार्य डी.आर. कुलकर्णी, ॲड. सय्यद शाकेर, जेष्ठ सहकारी विलास मेंडके, फुलंब्रीचे तालुका अभियान व्यवस्थापक अनिरुद्ध जोशी यांच्यासह महाराष्ट्रभरातून त्यांचे अभिनंदन केले असून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील सर्वांचे आणि मातृभूमी प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गंगाधर वानोळे यांनी आभार मानले आहेत.
माझ्या कार्याचा विद्यार्थी हाच केंद्रबिंदू – वानोळे
गेली १७ वर्षे शैक्षणिक व सामाजिक कार्य करताना विद्यार्थी हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. विद्यार्थी हिताला प्राधान्य देताना नकळत अनेकांची मने दुखावल्याने मनात अतीव दुःख आहे. पण यात कधीच तडजोड केली नाही. यापुढेही विद्यार्थी विकास आणि विद्यार्थी हीत हाच माझ्या कार्याचा केंद्रबिंदू राहणार असून सहकार्य केलेल्या सर्वांचा व मातृभूमी प्रतिष्ठानचा मी ऋणी आहे.