
काय म्हणाल्या अंजली दमानिय..!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणातील आरोपींपैकी एका आरोपीने लातूर जेलमध्ये आपली रवानगी करावी असे मागणी कोर्टाकडे केली आहे. या संदर्भात तपासधिकाऱ्याने देखील आक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आक्षेप घेतला आहे.
आपण पोलिस महासंचालक आणि मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहील्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. जे सराईत आणि हार्डकोअर गुन्हेगार आहेत त्यांना जिल्ह्याबाहेरील जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे यांनी आपल्याला लातूर जेलमध्ये ठेवण्यात यावे अशी मागणी करणारा अर्ज सीबीआयच्या विशेष न्यायालयात केला आहे. यावर आयओने देखील कोणताही आक्षेप घेतलेला नसल्याने हा धक्कादायक प्रकार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. आपण आजच डीजी आणि चीफ जस्टीसना पत्र लिहून मागणी केली आहे. जे हार्डकोअर क्रिमिनल आहेत. त्यांना जिल्ह्याबाहेरील जेलमध्ये ठेवू नये असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे
आपले तर म्हणणे आहे की या सर्व आरोपींना जिल्ह्याच्या बाहेर नेण्याच यावे. कारण या प्रकरणातील अधिकारी आणि तुरुंगप्रशासन या सर्वांवरच दबाव आहे.या आरोपींना मुंबईच्या आर्थर रोडमध्ये ठेवण्यात यावे कारण यंत्रणांवर दबाव येतोय, हे आपण डीजींना सांगणार असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड याचे नाव एका गंभीर गुन्ह्यांत वगळण्यात आल आहे, हे प्रकरणही धक्कादायक आहे असेही दमानिया यांनी आरोप केला आहे.
अजितदादा दहावी नापास
अजितदादा दहावी नापास, त्यांना अर्थ कळतं का ? आधी पैसे खर्च करतात मग बजट तयार करतात. तुम्ही भाजपमध्ये जा तुमच्या चौकशा संपतात, छगन भूजबळ बाबत ईडीने जो प्रयत्न केला ही बातमी पेरण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे.सगळे पक्ष फोडले, राजकारणाचा सत्यानाश केला आहे अशी जहरी टीका अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.