
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
येलवाडी ..तीर्थक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी उर्मिला बाजीराव गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.बुधवार ( ता.२२ ) येलवाडी ग्राम पंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक पूनम शेवाळे यांच्या उपस्थित ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंचपदा साठी एकमेव उर्मिला गायकवाड यांचा अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पूनम शेवाळे यांनी उर्मिला गायकवाड यांच्या अर्जाला मंजुरी दिली.त्यानंतर येलवाडी गावचे सरपंच रणजित गाडे यांनी ,उर्मिला गायकवाड यांची उपसरपंचपदी निवड झाली असल्याची अधिकृत घोषणा केली.
ग्रामसेवक अधिकारी पूनम शेवाळे , सरपंच रणजित गाडे ,सदस्या प्रज्ञा बोत्रे , मनीषा चौधरी , सुजाता गाडे ,सदस्य प्रशांत गाडे , विक्रम बोत्रे , प्रदीप गायकवाड , सुधीर गाडे , गोवर्धन बोत्रे आदींनी उर्मिला गायकवाड यांचा पुष्पमाला घालून शाल श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
त्यानंतर उर्मिला गायकवाड यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ,
देहूच्या माजी नगराध्यक्षा , स्मिता चव्हाण ,
अंकुश सोनवणे ( कोथुरणे ता .अध्यक्ष आरपीआय ) प्रेमदास भोसले ( माजी ग्राम पंचायत सदस्य ), महेश बोत्रे ( माजी ग्राम.पंचायत सदस्य ) , पै.गणेश बोत्रे ,जीवन बोत्रे , रमेश बोत्रे , श्यामराव गायकवाड ,प्रकाश गायकवाड , अमर कसबे ,गणेश गायकवाड ,जालिंदर बोत्रे , सचिन गायकवाड , प्रणय चव्हाण ,राजू कांबळे , सुनील तुळवे , माऊली शेवकर आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ , महिला सहभागी झाले होते.