
महाराष्ट्र संघ सलग दुसऱ्यांदा रिपब्लिक कप चा विजेता !
पुणे प्रतिनिधी / उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चषक इंडियन ओपन रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा 18 आणि 19 जानेवारी रोजी अहिल्यानगर येथील वाडियापार्क क्रीडा संकुलात यशस्वीरीत्या पार पडली. सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र संघाने विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.
स्पर्धेचे आयोजन
या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन स्वर्गीय भारती कैलास शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन व युथ कराटे फाउंडेशन यांनी केले होते, तर शिवसेना शहरप्रमुख सचिन जाधव आणि शिवसैनिकांनी आयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
परिणाम आणि बक्षिसे
स्पर्धेत 15 राज्यांतील 830 खेळाडूंनी सहभाग घेतला. महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकावला, कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर राहिला, तर राजस्थानने तिसरे स्थान मिळवले. विजेत्या संघाला 51 हजार रुपये रोख रक्कम व आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात आली. प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना 5 हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे आणि आमोल खताळ उपस्थित होते.
आयोजकांचे मत
हर्षद शिंदे :-स्वर्गीय भारती कैलास शिंदे स्पोर्ट्स फाउंडेशन सबिल सय्यद :-युथ कराटे फाउंडेशन यांनी कराटे खेळाला राष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देण्याचा उद्देश यशस्वी झाल्याचे सांगितले.आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावत महाराष्ट्र संघाने रिपब्लिक कप कराटे चॅम्पियनशिपवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून, कराटे खेळाला राष्ट्रीय स्तरावर नवी दिशा मिळाली आहे.