नैराश्येतून उच्चशिक्षित तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
जालन्यातील बदनापूर येथील गणेश नगर भागात राहणाऱ्या एका उच्चशिक्षित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिन वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु असताना उच्चशिक्षण घेऊन शासकीय नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून या तरुणीने टोकाचे पाऊल उचलले आहे.
यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जालन्यातील बदनापूर येथे वास्तव्यास असलेली राणी नाईकवाडे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. राणीने विज्ञान शाखेची पदवी घेतली असून ती मागील दोन ते तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. मात्र उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने तिने हे टोकाच पाऊल उचलल आहे. दरम्यान याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.
नातेवाईकांचा आक्रोश
दरम्यान मुलीला आरक्षण मिळालं असतं तर माझ्या मुलीने आत्महत्या केली नसती. तिच्याबरोबरच्या अनेक मुली कमी मार्क असून देखील त्यांचे यूपीएससी, एमपीएससीमध्ये जॉब लागले. मात्र माझ्या मुलीला आरक्षण नसल्यामुळे चांगले मार्क मिळवून सुद्धा तिला नोकरी न लागल्यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे राणीची आई संगीता नाईकवाडे यांनी सांगत एकच आक्रोश केला.
नोकरीसाठी सुरु होते प्रयत्न
विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त करून दोन ते तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी केली होती. यासोबत राणी हिने अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज भरले होते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असून देखील नोकरी मिळत नसल्याने राणी हि नैराश्येत होती. यातून तुने टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
