
हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सणसणीत चपराक
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपचे मंत्री नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. आता या प्रकरणी मुंबई हायकोर्टात एका याचिकेवर सुनावणी झाली.
हायकोर्टाने आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? असं म्हणत याचिकाकर्त्यांचे चांगलेच कान उपटले. एवढंच नाहीतर, तपास यंत्रणा काम करत असताना तुम्हाला आरोप करण्याची गरज काय? अशा शब्दांत ही फटकारलं.
सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अशिलांच्या संघटनेचे अध्यक्ष राशिद खान पठाण यांनी जनहित याचिका दाखल केली होती. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची याचिकेतून मागणी केली होती. आज या याचिकेवर हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी,आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय? या मुद्द्यावर दोन आठवड्यात गुणवत्ता आधारावर पटवून द्या, असं स्पष्ट म्हणत मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे.
यावेळी आदित्य ठाकरे यांचे वकील सुदीप पाचबोला यांचा जोरदार युक्तिवाद केला. तर याचिकाकर्त्यांचे वकील निलेश ओझा यांनीही जोरदार हरकत घेतली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती आलोक अधारे यांनी हस्तक्षेप करत ‘अनेक तपास एजन्सी तपास करत आहेत. मग, तुम्हाला हे आरोप का करावेसे वाटतात? असा खडासवाल कोर्टाचने याचिकाकर्त्यांना केला.
तर याचिकाकर्ते म्हणून आधी आमची बाजू ऐकावी, अशी याचिकाकर्त्यांचे वकिल यांनी आग्रही भूमिका मांडली. मात्र,आदित्य ठाकरे यांची भूमिका ऐकण्यास मुख्य न्यायमूर्ती आलोक अंधारे, न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी सहमती दिली.
याचिकेमध्ये काय काय मागण्या करण्यात आल्यात?
– 8 जून 2020 रोजीचं दिशा, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांच मोबाईल लोकेशन तपासलं जावे, कारण त्या रात्री हे सगळे 100 मीटरच्या परिसरात एकत्रच होते
– तसंच 13 आणि 14 जून 2020 रोजीचं सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती यासर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसंच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटिव्ही फुटेज तपासलं जावं.
– सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर काय बोलणं झालं ?
– याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणा-या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी
– भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचीही सखोल चौकशी व्हायला हवी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली.