
पुणे प्रतिनिधी: दिनांक 5/2/2025 बुधवार रोजी राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान क्रीडांगण , चरोली (आळंदी), पिंपरी चिंचवड या ठिकाणी पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशन चे सचिव श्री. रामा रणदिवे सरांच्या आयोजनामध्ये टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन करण्यात आले होते यात पुणे जिल्ह्यातून विविध तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग नोंदवला होता लीग सामन्यातून दहा संघांनी आगेकूच करत आपल्या विजयाची मालिका सुरू ठेवत गुणतालिकेत आपली पकड मजबूत केली
ए.एम.एस.ए महाराष्ट्रच्या खेळाडूंनी आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीने लीग स्टेज चे सामने मोठ्या फरकाने जिंकले पहिला सामना 10 धावांनी ने तर दुसरा 30 धावांनी जिंकत स्पर्धेत तगडे आव्हाहन निर्माण केले पुढे उपउपांत्य फेरीत शिवाजियंस संघास 14 धावांनी नमवत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली पुढे उपांत्य फेरीत तिन संघ असल्याने हिंद इंग्लिश मिडीयम स्कूल ला बाय भेटली व ते अंतिम फेरीत पोहचले पुढे ए.एम.एस.ए महाराष्ट्र विरुद्ध सेंट जोसेफ स्कूल असा उपांत्य फेरीचा सामना झाला रंगतदार सामन्यात ए.एम.एस.ए महाराष्ट्र संघाने पुन्हा 10 धावांनी विजय मिळवत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
अंतिम फेरीत सामना तुल्यबळ झाला सुपर ओवर मध्ये गेलेला सामाना 6 चेंडू 12 धावा इथपर्यंत आला ए.एम.एस.ए महाराष्ट्र संघाने 8 धावा काढल्या व स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागला संपूर्ण स्पर्धेत एक ही सामना न गमावलेल्या संघाला अंतिम फेरीत अपयश आले व फर्स्ट रनर अप वर समाधान मानावे लागले स्पर्धेचे बक्षीस वितरण काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष निम्हण साहेब यांच्या हस्ते झाले.
ए.एम.एस.ए महाराष्ट्र संघातील खेळाडूंची नावे –
1) हितेश पटेल 2) अंश यादव 3)चैतन्य कांबळे 4)सुगत साबळे 5)ऋषी भालेराव 6)गौस मोहम्मद खान 7)वेंकट नाणी बिर्रा 8)आयुष चौहान 9)आकाश कोटलापुरे 10)सोहम बनसोडे 11)रुद्र बागुल 12)सचिन सिंगा 13)निनाद चाबुकस्वार 14)गितेश पारचे या सर्वांनी संघाचे नेतृत्व केले.
वात्सल्य पब्लिक स्कूल चे संस्थापक श्री. राजीव अरोरा सर द वात्सल्य स्कूल उंड्री संचालिका सौ. विनिता अरोरा मॅडम तसेच शाळा व्यवस्थापक सौ. कोमल ओझा मॅडम त्याचबरोबर माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका सौ. बिष्णु भंडारी मॅडम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका सौ.शिल्पा पल्ली मॅडम वरिष्ठ लिपिक श्री. शिवशंकर कनोजिया सर कनिष्ठ लिपिक श्री. संतोष कालेकर सर , वरिष्ठ शिक्षक श्री. अश्विनीकुमार बीचीतकर , श्री. अक्षय कालेकर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक श्री कृष्णा हनुमंत आडागळे सर व सहकारी प्रशिक्षक ओमकार पुजारी , सूरज राय, अर्जुन पवार , प्रेम गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.