
सध्या महाराष्ट्रातगुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) या दुर्मिळ आजाराचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. पुण्यापाठोपाठ मुंबईतही या आजाराचे थैमान पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत जीबीएस या आजाराने शिरकाव केला होता.
त्यामुळे मुंबईकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच आता मुंबईतून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मुंबईत जीबीएस आजारामुळे पहिला बळी गेला आहे. वडाळ्यात राहणाऱ्या एका 53 वर्षीय रुग्णाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळ्यात राहणारा एक रहिवाशी हा बीएन देसाई रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करत होता. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. त्याच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली.
यामुळे पुण्यानंतर मुंबईतही जीबीएसचे थैमान पाहायला मिळत आहे. नायर रुग्णालयात या व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. वडाळ्यातील 53 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूमुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.