
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले ?
प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्राचे नेते आहेत, ते जिल्ह्याचे आहेत, सामाजिक व इतर गोष्टींसाठी भेट घेण्यासाठी आलो. वेगवेगळ्या अर्थाने चर्चा झाली. सोलापूरकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही, तर अधिवेशनात आवाज उठवणार असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
शरद पवार मोठे नेते आहेत. पुरस्कार कोणी द्यायचा, कोणी घ्यायचा हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यांना अजून शरद पवार समजले नाहीत” असं संजय राऊत यांच्याबद्दल मिटकरी म्हणाले. ठाकरे कुटुंब फोडण्याला संजय राऊत हे कारणीभूत आहेत. एकनाथ शिंदे फुटण्याला, आग लावणारे तुम्हीच आहात अशी टीका मिटकरी यांनी केली.
विमा कंपन्या मालामाल होतात, अशा काही योजना बंद करणं त्याचं स्वागत केलं पाहिजे. पात्र बहिणी यांना फायदा झाला पाहिजे, सरकार बंद पडू देणार नाही. कुचकामी योजना बंद करणार असतील तर ते चांगलं आहे असं अमोल मिटकरी म्हणाले. बीड जिल्ह्याला आज बदनाम केलं जात आहे. अजूनही संतोष देशमुख यांच्या काही मारेकऱ्यांचा शोध लागला नाही असं मिटकरी म्हणाले.
‘मग समजेल ईव्हीएमची चीप मन्युपयुलेट होते की नाही’
अमोल मिटकरी अकोला जिल्ह्याचे आहेत. ते नेहमीच भेटतात. जिल्ह्याचे काही प्रश्न विचारायचे असतील, तर त्यांच्या मार्फत भेटतो” असं प्रकाश आंबडेकर या भेटीवर म्हणाले. “ईव्हीएम संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश योग्य आहेत. माझा एक विनंती ईव्हीएम चेक करावं. ज्या ईव्हीएम मतदार संघात होत्या, पण वापरल्या गेल्या नाहीत, अशा ईव्हीएम कोर्टाने त्यांच्या आवारात बोलवाव्यात आणि मतदान करायला सांगावं आणि ते मतदान योग्य येते का ते बघावे. त्या त्या उमेदवाराला 130 मतदान मिळत का ते तपासून घ्यावं. मग लक्षात येईल की ईव्हीएमची चीप मन्युप्युलेट होते की नाही” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
‘गणपतीची संख्या पण वाढत आहे’
लोकसंख्या वाढत आहे, गणपतीची संख्या पण वाढत आहे. पैशांचा सुळसुळाट आहे. एका रस्त्यावर दहा गणपती दिसतात, हा आता श्रद्धेचा भाग नाही, तर खेळाचा भाग झाला आहे. योग्य पॉलिसी करणे गरजेचे आहे. राजकारणासाठी मंडळ काढायचं आणि तेथे उपासनेपेक्षा हेटाळणी होते, असं मला वाटतं” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.