
अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (दि.१५) तारखे पासून सुरू होणारे साखळी उपोषण तूर्त स्थगित केल्याची माहिती मनोज जरांगे यांनी शुक्रवारी दिली.
मराठा आरक्षणासंदर्भातील दोन मागण्यांवर सरकारने निर्णय घेतला आहे.
उर्वरित दोन मागण्यांसाठी सरकारला १५ दिवसांचा वेळ दिला आहे.
त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. दोन मागण्यांबाबत निर्णय घेतल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सरकारचे आभार मानून कौतुक केले. या मागण्यांबाबत सरकार सहकार्य करत असेल, तर आमचे त्यांना सहकार्य असेल, असेही ते म्हणाले.