
प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवण्याऱ्यांपैकी एक म्हणजे IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील. विश्वास नांगरे पाटील यांचं नाव जरी घेतलं तरी अंगाला काटा येतो. त्यांनी मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनाही अपयशाचा सामना करावा लागला होता. परंतु अपयश हे आपल्यासाठी नाही, असं समजून त्यांनी पुन्हा त्याच चिकाटीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांच्या चार वर्षाच्या मेहनतीचे यश त्यांना मिळाले.
विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईत झालेल्या २६-११ च्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही त्यांचे अनेक व्हिडिओ बघितल्यावर अंगावर काटा येतो. त्यांनी प्रसंगावधान दाखवून सर्व परिस्थिती आटोक्यात आणली होती
विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म बत्तीस शिराळा तालुक्यात कोकरुड गावात झाला.त्यांचे वडील पैलवान आणि गावचे सरपंच होते. आपल्या मुलानेदेखील पैलवान व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.
विश्वास नांगरे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून बीए पदवी प्राप्त केले. प्रशासकीय सेवेत कार्यरत झाल्यानंतरही त्यांनी शिक्षण सोडले नाही. त्यांनी एमए केले. एलएलबीचं शिक्षण घेतले. त्यानंतर ट्रेनिंग सुरु असताना एमबीए पूर्ण केले.
विश्वास नांगरे पाटील यांचे वडील सरपंच होते. त्यामुळे गावातील सर्व लोक त्यांना मानायचे. त्यांचा धाक होता. दरम्यान, एखादा एका शिक्षिकेने विश्वास नांगरे पाटील यांना मारले होते. तेव्हापासून त्यांनी स्वतः च्या अस्तित्वाचा शोध घेण्यास सुरुवात केला. आपण काहीतरी करु शकतो यासाठी त्यांनी धडपड केली.
विश्वास नांगरे पाटील यांनी त्यानंतर शाळा बदलली. रोज सकाळी दीड तासांचा प्रवास करुन ते शाळेत जायचे. परंतु यात त्यांचा खूप वेळ वाया जायचा. त्यामुळे त्यांच्या शाळेतील गायकवाड सरांनी त्यांना तिथेच राहण्याचा सल्ला दिला.
गायकवाड सरांकडे राहून त्यांना सकाळी तीन वाजता उठूव व्यायाम करायची सवय लागली. ते पहाटे तीन वाजताच उठायचे. त्यानंतर रोज ३.३० ते ८.३० पाच तास अभ्यास करायचे. त्यांनी अभ्यासासाठी वेळापत्रक तयार केले. होते. त्यानंतर दुपारी चार तास आणि संध्याकाळी चार तास अभ्यास करायचे.
विश्वास नांगरे पाटील यांनी १०वीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळवले. त्यांनी पहिला नंबर पटकावला. त्यामुळे आपण जिथे हात मारु तिथे पाणी काढू असा आत्मविश्वास त्यांना मिळाला. याचा त्यांना खूप फायदा झाला.
विश्वास नांगरे पाटील यांनी ११ वीत विज्ञान शाखेत प्रवेश घेतलं. त्यावेळी बारावीला असताना भूषण गगराणी यांचे व्यायाख्यान ऐकले. त्यानंतरच त्यांनी स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पर्धा परीक्षेची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी मुंबई गाठलं. विश्वास हे कायम मुंबईत असल्याने वडील त्यांना पत्र पाठवायचे. आयएएस अधिकारी होऊन लाल दिव्याच्या गाडीतून आल्याचे मला पाहायचे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती.
आपल्या वडिलांसाठी अभ्यास करायचा आणि त्यांचे स्वप्न पू्र्ण करायचे अशी त्यांची इच्छा होती.११९५ मध्ये ते एमपीएससी परीक्षा पास झाले.परंतु मुलाखतीत त्यांना यश मिळालं नाही.
१९९६ वर्ष त्यांच्यासाठी खूप अवघड होतं. परंतु वडिलांनी त्यांना त्यातून बाहेर येण्याची प्रेरणा दिली. त्यानंतक मुंबईत आमदार निवासात विश्वास नांगरे पाटील राहायचे. या काळात त्यांनी अनेकदा उदास वाटायचे. ते अनेकदा मरीन ड्राइव्हला जाऊन बसायचे.
१९९७ रोजी त्यांनी पुन्हा नव्या ऊर्जेने अभ्यासाला सुरुवात केली.त्यावेळी ते आपल्या आत्याकडे आंबिवली राहायचे. त्यानंतर रोज सकाळी ३.३० ची ट्रेन पकडून सीएसटी गाठायचे. ग्रंथालयात पोहचणारे ते पहिले असायचे. त्या वर्षी ते १३ परीक्षांमध्ये पास झाले.परंतु १९९७ च्या परीक्षेत ते आयपीएस झाले नव्हते. तर एमपीएससीमधून उप जिल्हाधिकारी म्हणून निवडले होते. त्यानंतर ते पीएसआयच्या फिजिकलपर्यंत गेले होते. मुलाखतीसाठी ते खूप घाबरले होते. त्यांनी मुलाखत जनरल सुरेंद्रनाथ यांचे पॅनेल घेणार होते. इंग्रजी चांगली नसल्याने त्यांना खूप दडपण आले होते.
विश्वास नांगरे पाटील या प्रसंगालादेखील खूप हिम्मतीने सामोरे केले. त्यांनी आत्मविश्वासाने इंटरव्ह्यू दिला.त्यानंतर त्यांचे सिलेक्शन झाले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना त्यांनी नेहमी प्रेरणा दिली. विश्वास नांगरे पाटील यांचा हा प्रवास फक्त प्रेरणाच नव्हे तर अपयशातून पुन्हा उठण्यासाठी बळ देते.