
दै चालु वार्ता प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड
बद्रीनारायण घुगे
देहू दि.१९ रोजी रोजी सकाळी १०.वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देहूनगरपंचायत कार्यालय ठिकाणी साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देहूनगरपंचायतीच्या मुख्याधिकारी, मा. सौ.निवेदिता घार्गे व नगराध्यक्षा सौ पुजा दिवटे नगरसेविका सौ स्मिता चव्हाण , गटनेते योगेश परंडवाल शहरातील ज्येष्ठ पदाधिकारी मा. यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेची पूजा करण्यात आली. यानिमित्त शालेय विद्यार्थ्यांकडून शिवरायांच्या रांगोळी चे रेखाटन करण्यात आले, तसेच महाराष्ट्र राज्याच्या राज्य गीताचे गायन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती कार्यक्रम नगरपंचायत मधील अधिकारी संघपाल गायकवाड, ज्ञानेश्वर शिंदे, केशव पिनाटे, रामदास भांगे, सुरेंद्र आंधळे व कर्मचारी दत्ता शिंदे , महेश वाळके, कुर्हाडे
तसेच नगरपंचायत चे इतर कर्मचारी
इत्यादींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.