
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) 10 वीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात होत असून, राज्यात 16 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. पहिला पेपर मराठीचा असून सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत हा पेपर होईल तर दुपारी 3 ते 6 या वेळेत द्वितीय भाषेचा पेपर विद्यार्थी सोडवतील.
परीक्षेसाठी सर्व केंद्रे सज्ज असून किमान 30 मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. संगमेश्वर मधील कसबा पेठे येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक बांधण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. सरदेसाई वाडा परिसरातील जमिनीची मोजणी होऊन सरकार जमीन खरेदी करणार. सात दिवसात जमिनीचे नकाशे सादर करा, असे आदेश मंत्री योगेश कदम यांनी भूमी अभिलेख विभागाला दिले आहेत.
इचलकरंजी शहरातील जर्मनी टोळीने सोशल मीडियावर वाढदिवस साजरा करून दहशत माजवली होती. कोल्हापूर पोलीसांनी इचलकरंजी शहरातील चौका चौकामध्ये या सर्वांची धिंड काढली. ज्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला होता त्या ठिकाणी नेऊन चौकशी केली. महाराष्ट्राच्या राजकीय आणि साहित्यिक विश्वातील चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिल्लीत आजपासून प्रारंभ होणार आहे. यासह देश-विदेशातील राजकीय, क्रीडा, सामाजिक, मनोरंजन अशा सर्व बातम्यांचे अपडेट्स वाचण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.