दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
हाळदा व उमरज येथील मठ संस्थांनच्या कार्यक्रमांना उपस्थिती तसेच डॉ.सुनील व ॲड.विजय या धोंडगे बंधुच्या कंधार येथील संपर्क कार्यालयाचे उदघाटन अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोमवारी दि. ३ मार्च रोजीचा अशोकराव चव्हाण यांचा हा दीड महिन्यात तिसरा कंधार दौरा असणार आहे.
अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्या नंतर भाजपात इन्कमिंगचे सत्र सुरूच आहे. आशोकराव यांच्या मुळे कंधार – लोह्यातील अनेक पुढाऱ्यांनी भाजपा प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्या सोबतच कंधार – लोह्यात ही भाजपाची चांगलीच ताकद पूर्वी पेक्षा चांगलीच वाढली आहे. गत एक ते दीड महिन्यात अशोकराव चव्हाण तिसऱ्यांदा कंधार दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे राजकीय गोटात याची चर्चा होत आहे. शिवाय येथील भाजपा कार्यकर्त्यांना राजकीय बळ मिळत आहे.
अशोकराव चव्हाण सोमवार दि. ३ मार्च रोजी सकाळी कंधार तालुक्यातील हाळदा येथील मठ संस्थांनच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार आल्याचे समजते, त्यानंतर दुपारी एक वाजता नुकताच भाजपात प्रवेश केलेले डॉ. सुनिल धोंडगे व ॲड.विजय धोंडगे या धोंडगे बंधुंच्या कंधार शहरातील बस स्थानका जवळ थाटण्यात आलेल्या भाजपा संपर्क कार्यालयाचे उदघाटन करणार आहेत व दुपारी तीन वाजता धाकटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरज येथील मठ संस्थांनच्या कळशारोहन, १०८ कुंडी विष्णुयाग यज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते प.पु.श्री.देवकीनंदन ठाकुर महाराज यांच्या भागवत कथेच्या कार्यक्रमास उपस्थित राहणार अल्याची माहिती आहे.