
भोकर प्रतिनिधी
अंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या ग्रामीण जिल्हा सहसचिव पदी दै.रोकठोक प्रतिनिधी सुभाष नाईक किनीकर यांची निवड करण्यात आली तर भोकर तालुका अध्यक्ष दत्ता बोईनवाड, उपाध्यक्ष म्हणून अनिल डोईफोडे व सुरेशसिंग चौधरी यांची निवड झाल्याचे पत्र देऊन सन्मान करण्यात आले आहे.
तब्बल ४४ देशात कार्यरत असलेल्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मधे रेकॉर्ड नोंद असलेल्या व संस्थापक अध्यक्ष भुमीपुत्र संदीप काळे असलेल्या पत्रकारांच्या हितार्थ अंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत व्हाईस ऑफ मिडीया या पत्रकार संघटनेच्या जिल्ह्यातील पत्रकाराची बैठक दि.९ मार्च २०२५ रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे संपन्न झाली. या बैठकिच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ.प्रा.गणेश जोशी हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे,मा.ना.झेंपलवाड,व्यंकटेश जोशी,कोंडेकर, सदस्या ज्योती सरपाते मॅडम उपस्थित होते. या बैठकीत प्रथम शेतीनिष्ठ शेतकरी तथा व्हाईस ऑफ मिडीया व महाराष्ट्र शासनाकडुन सन्मान प्राप्त व्यंकटेश जोशी यांचा व्हाॅइस ऑफ मिडीया संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बैठकीत पत्रकारांच्या विवीध समस्यावर चर्चा करण्यात आली.यानंतर काही पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यात दैनिक विष्णूपुरीचे मुख्य संपादक मनोज बुंदिले यांची जिल्हा उपाध्यक्ष (ग्रामीण) तर दैनिक रोखठोक तथा लोकभावना न्युज पोर्टलचे संपादक सुभाष नाईक किनीकर (माली पाटील) यांची जिल्हा सह-सचिव (ग्रामीण) पदी निवड करण्यात आली. तसेच तालुका कार्यकारिणी भोकर तालुका अध्यक्ष- दत्ता बोईनवाड, उपाध्यक्ष- अनिल डोईफोडे, सुरेश सिंग चौधरी, कार्याध्यक्ष- संतोष रतनवार, सचिव-अनील कराळे,संघटक- बि.प्रकाश आदी या सर्वांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा अध्यक्ष गणेश जोशी, कार्याध्यक्ष बाळासाहेब पांडे,व्यंकटेश जोशी व मनोज बुंदेले यांचे मार्गदर्शन झाले अन् बैठक खेळी मेळीच्या वातावरण संपन्न झाली.