
बॉलिवूडचा अभिनेता भाईजान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘सिकंदर’मुळे चांगला चर्चेत आहे. नुकतीच ‘सिकंदर’बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. ‘सिकंदर’च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे.
‘सिकंदर’च्या ट्रेलर आणि चित्रपटातील गाण्यांमुळे प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ‘सिकंदर’च्या गाण्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रिलीज डेटमध्ये बदल सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना सांगितले आहेत.
‘सिकंदर’ कधी रिलीज होणार ?
सलमान खानच्या ‘सिकंदर’चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट आधी 28 मार्चला शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आता ‘सिकंदर’च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. ‘सिकंदर’ चित्रपट आता 28 मार्चला नाही तर 30 मार्च रविवारी रिलीज होणार आहे. सलमान खानने खास पोस्टर शेअर करून रिलीज डेटची माहिती दिली आहे. 30 मार्चला महाराष्ट्रीयन सण गुढीपाडवा देखील आहे. तर ईद 31 मार्चला असणार आहे.
सलमानने घेतली रिस्क
‘सिकंदर’ रविवारी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार की पहिल्याच दिवशी कमाईतल घट्ट होणार हा प्रश्न आता उभा राहिला आहे. चित्रपट रविवारी रिलीज करण्याचा निर्णय घेऊन सलमान खानने रिस्क घेतली आहे. कारण लाँग वीकेंडची कमाई सलमानला करता येणार नाही आहे. शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सर्वाधिक चित्रपट पाहिले जातात. मात्र रविवारी चित्रपट रिलीज करून चित्रपटाच्या कमाईत घट्ट होण्याची शक्यता आहे.
‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान सोबत साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदाना ही जोडी पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. यांचे चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. चित्रपटाच्या रिलीज झालेल्या गाण्यांमधून सलमान आणि रश्मिकाची भन्नाट केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
सलमान आणि रश्मिकासोबतच ‘सिकंदर’ चित्रपटात काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी झळकणार आहे. ‘सिकंदर’ च दिग्दर्शन ए.आर.मुरुगदास यांनी केले आहे. ‘बाहुबली’ फेम अभिनेते सत्यराज ‘सिकंदर’ चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. ‘सिकंदर’चा बजेट 180 कोटी आहे. चित्रपटाने रिलीजआधीच तब्बल 165 कोटींची कमाई केली आहे.