
दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे)
“सामाजिक कार्यकर्ते निलेश यशवंत वाळुंज यांच्या प्रयत्नांना यश त्रस्त झालेल्या रुग्णांमधून समाधान व्यक्त”
“वाळुंज यांनी ससून अधिष्ठाता एकनाथ पवार यांच्या कार्यालयात अनेकदा संपर्क करूनही रुग्णांच्या/नागरिकांच्या गंभीर समस्या ऐकायला पवार यांना वेळ नाही, साहेब व्यस्त आहेत असे बेजबाबदारपणे उत्तर तेथील महिला “rmo डॉ आणी अधिष्ठाता यांचे स्वीय सहायक भंडवार देतात, अधिष्ठाता आणी त्यांचे सदर कर्मचारी स्वतःला लोकसेवक मानतात की नाही? असा प्रश्न उपस्थित करत या कार्यालयाच्या गलथान कारभाराविरुद्ध वाळुंज यांनी “संचालनालय,वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग, मुंबई आयुक्त “राजीव निवतकर (वैद्यकीय शिक्षण) तसेच डॉ.अजय चंदनवाले संचालक(वैद्य) यांच्याकडे ईमेल आणि व्हाट्सअप द्वारे तक्रार करत. मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य मानवी हक्क आयोग मुंबई” यांच्याकडे सुद्धा तक्रार करण्यात आली आहे”
सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी केलेल्या तक्रारीनंतर “पुण्यातील ससून रुग्णालयातील गलथान कारभारामुळे रुग्णांसह नातेवाईकांच्या जीवाशी होतोय खेळ रुग्णालय प्रशासन आणि अधिष्ठाता ढेकणांना आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांना आवरणार का? या आशयाचे बातमीपत्र दिनांक १५ व १६ मार्च रोजी दैनिक चालू वार्ताने प्रसारित केले होते, तसेच याप्रकरणी योग्य कार्यवाही न केल्यास अधिष्ठाता यांनाच ढेकूण भेट देण्याची वेळ आमच्यावर येऊ नये असा इशाराही वाळुंज यांनी दिला होता
यानंतर ससून प्रशासनाने तातडीने हालचाल करत वार्ड क्रमांक आठ मध्ये स्वच्छता करण्यास व ढेकणांच्या बंदोबस्तासाठी फवारणी करण्याचे काम हाती घेतले यामुळे तेथील रुग्ण व नातलगांमधून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले आहे, कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत अधिष्ठता कार्यालयाने कोणताही खुलासा केला नाही परंतु ढेकणांच्या प्रकरणी अधिष्ठाता यानी वाळूंज यांच्या तक्रारीनुसार खालील प्रमाणे अजब गजब खुलासा केला असून यामध्ये रुग्ण किंवा रुग्णांच्या नातलगांमुळेच ढेकूण येतात अशी शक्यता वर्तविण्यात आली असून “:- “उपरोक्त विषयाच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, रुग्णालयात पेस्ट कंट्रोल नियमित स्वरूपात करण्यात येते. सद्यस्थितीत अलीकडील पेस्ट कंट्रोल हे आज दिनांक १७-०३-२०२५ रोजी करण्यात आलेले आहे. सदरचे काम हे वैद्यकीय अधीक्षक व वैद्यकीय उपाधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे यांच्या नियंत्रणाखालील स्वच्छता निरीक्षक यांच्यामार्फत करण्यात येते. तरीही रुग्णालयात येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची वाढती आवक जावक पाहता, त्यांच्या साहित्यातून किंवा पिशव्यामधून ढेकूण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही तक्रारीच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक यांना निर्देश देण्यात आलेले आहेत”” असे उत्तर वाळुंज यांना अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे.
वाळुंज यांच्याकडून सांगण्यात आले की इथे कधी उंदीर चावून रुग्णांचा जीव गेल्याच्या बातम्या येतात तर कधी निराधार गरीब रुग्णांना डांबून ठेवण्याच्या तसेच बाहेर नेऊन सोडण्यात आल्याच्या बातम्या प्रसारित होताता आणी आत्ता “ढेकण”, या प्रकारांमुळे जगावे की मरावे अशी रुग्ण व नातेवाईकांची द्विधा अवस्था झालेली आहे, मध्यंतरी गावातीलच एक वयस्कर गरजू आजोबांच्या हृदयसंबंधी शस्त्रक्रियेसाठी ससून रुग्णालय येथे त्यांना आम्ही घेऊन गेलो होतो, ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ससून मध्ये करण्यात आली होती “स्पेस मेकर” बसून त्या आजोबांना बरे करण्यात आले होते, त्यावेळी येणाऱ्या समस्यांबाबत तसेच या शस्त्रक्रिये प्रकरणी स्वतः वैद्यकीय अधीक्षक यांना भेटल्यानंतर “वैद्यकीय अधीक्षक यल्लाप्पा जाधव व डॉक्टर मयूर सातपुते” यांनी प्रकरणी विशेष लक्ष घातले होते, याबाबत संबंधितांचे आभार व्यक्त केले होते आणि प्रत्येक रुग्णाला योग्य उपचार व योग्य वागणूक मिळावी अशी आग्रही भुमिका त्यावेळी मांडली होती, ही एक जरी समाधानाची बाजू त्यावेळची असली तरी वारंवार रुग्ण व नातेवाईकांच्या सुरक्षा व सुविधांच्या बाबतीत घङणारे प्रकार हे संतप्त करणारे आहेत” सर्वसामान्यांसाठी ससून एक महत्त्वाचा दुवा असल्याने तिथे गांभीर्यपूर्वक सुधारणा होणे आवश्यक आहे”
आता या एकंदरीत संपूर्ण प्रकरणी वाळुंज यांनी आयुक्त आणि संचालक यांच्याकडे तक्रार केलेली आहे याबाबत वरिष्ठ कार्यालय काय निर्देश देते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल यामुळे एक गोष्ट मात्र प्रखरतेने उजेडात आली की सर्वसामान्यांच्या जीवाशी किंवा व आरोग्याशी वाटेल तसे खेळता येते वाटेल तसे उत्तर ही देता येते सर्वसामान्यांच्या जीवाला जणू काही किंमतच नाही किंवा त्यांच्या जगण्याला काही अर्थच नाही का? असाही प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे, ससून मध्ये कधी उंदरांमुळे सर्वसामान्य रुग्णांचा जीव गेल्याच्या बातम्या यापूर्वी प्रसारित झालेले आहेत कधी निराधार लोकांना बाहेर डांबून ठेवल्याच्या बातम्या प्रसारित झालेल्या आहेत एकंदरीत निराधार व गोरगरिबांच्या सर्वसामान्यांच्या मरण यातना ससून मध्ये कधी थांबणार असा जनतेला प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. शासन स्तरावरून या बाबी गांभीर्याने विचारात घेणे आवश्यक आहे आणि इथे एखाद्या तडफदार अधिकाऱ्याची नियुक्ती करणे ससूनच्या सुधारणा करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या हितासाठी आवश्यक आहे.
–
———————————————–
याबाबत आवाज उठवल्यानंतर प्रशासनाला जाग आली गेले दोन दिवस तिथे ढेकणांवर प्रतिबंध करण्यासाठी फवारणी झाल्याचे व यामुळे ढेकूण गेल्यामुळे वॉर्ड मध्ये रात्री ढेकणांच्या दहशतीशिवाय झोपणे शक्य झाल्याचे वार्ड मधून समजले यामुळे रुग्ण व नातलगांमधून आनंद व्यक्त केला गेला, ही कामे खरंतर संबंधित विभागाने स्व-प्रेरणेने करणे आवश्यक होते परंतु त्यासाठी तक्रार करावी लागली हे खेदजनक आहे, याप्रकरणी तात्काळ स्वच्छता निरीक्षक व इतर जबाबदार अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करण्यात यावी, ,आयुक्त कार्यालय काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलेले आहे,मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्य मानवी हक्क आयोग मुंबई” यांच्याकडे सुद्धा याबाबत तक्रार करण्यात आली आहे, “स्वातंत्र्याच्या ७६ʼʼ वर्षानंतर जर अशी आरोग्य व्यवस्था सर्वसामान्य व गोरगरिबांना देणार असतील तर हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रुग्णांच्या वैद्यकीय सुरक्षेचे उल्लंघन आहे.
“निलेश यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)”