
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : वाघोली परिसरातील अनेक भागात उघड्या डीपी बॉक्समुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. महावितरण त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.परिसरातील धोकादायक स्थितील डीपींची त्वरित दुरस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कचऱ्याच्या विळख्यात अडकले डीपी
रस्त्याच्याकडेला डीपी बसविण्यात आली आहेत. यातील अनेक डीपीचे झाकण गायब असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा सर्वांधिक धोका संभवित आहे. परिसरात लहान मुले खेळत असताना पालकांच्या जिवाला घोरच लागतो. एखादी मोठी दुर्घटना घडण्याअगोदर या डीपींची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली जात आहे. अनेक डीपी व ट्रान्सफार्मर भोवती कचऱ्याचे ढीग साचलेले पहायला मिळतं आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. अनेक भागांत उघड्या डीपीकडे महावितरण सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
महावितरणचे दुर्लक्ष
वाघोलीतील अनेक परिसरात अशा अनेक उघड्या डीपी आहेत.याकडे महावितरण कानाडोळा करीत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. डीपीही मृत्यूचा सापळा बनली आहे. पीएमटी बस स्टॅन्डच्या पाठीमागील रस्त्यावर उघड्या असलेल्या डीपी शेजारी सतत गर्दी पाहायला मिळते. तसेच, याठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते. जवळच असलेल्या डीपीमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शॉर्टसर्किटची भीती
झाकण नसलेल्या डीपीतून शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही या महत्त्वाच्या बाबींकडे महावितरण आणि महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. डीपींची दुरुस्ती आणि विजेशी संबंधित नादुरुस्त उपकरणाची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. परिसरातील डीपी बॉक्सला झाकण कधी बसवली जाणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.