
दैनिक चालु वार्ता उस्माननगर ( प्रतिनिधी )-लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- कंधार तालुक्यातील कळका येथील भूमिपुत्र सचिन गायकवाड व श्रीराम भांजे यांना नुक्ताच एमजीएम काॅलेजच्या वतिने घेण्यात आलेल्या नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट काॅम्पीटिशनमध्ये पुरस्कार प्राप्त झाला आहे कंधार तालुक्यातील कळका येथील ज्येष्ठ पत्रकार बाजीराव पाटील गायकवाड कळकेकर यांच्या मुलाला नांदेड येथील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) काॅलेज आॅफ काॅम्पुटर सायन्स अँड आय.टी.महाविद्यालयामार्फत १८ मार्च २०२५ मंगळवार रोजी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल लेव्हल प्रोजेक्ट काॅम्पीटिशन’ मध्ये विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये लाईफ सायन्स आणि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान या विषयावर आधारित विषयावर विविध प्रोजेक्ट सादर करण्याची स्पर्धा महाविद्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेली होती. त्यामध्ये महाविद्यालयातील एम.एस्सी बायोटेक्नॉलॉजी या वर्गातील विद्यार्थी सचिन बाजीराव गायकवाड व श्रीराम उत्तमराव भांजे या दोन विद्यार्थ्यांनी ‘इको-फ्रेंडली सिन्थेसीस आॅफ नॅनो-फर्टिलायझर’ या विषयावर आधारित प्रोजेक्ट सादर केला होता व त्यावर उत्कृष्ट प्रदर्शन देले.त्यामुळे महाविद्यालयामार्फत त्यांचा तृतीय क्रमांक काढण्यात आला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.कमलकिशोर कदम साहेब, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाटकर मॅडम, प्राचार्य डॉ. शिरीष एल. कोटगीरे, उपप्राचार्या डॉ. कांचन नांदेडकर मॅडम, बायोटेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ.धनंजय गोंड, बायोइन्फर्मेटिक्स विभाग प्रमुख डॉ. मकरंद चेरेकर,बी.सी.ए. विभाग प्रमुख डाॅ. भोपी,आयक्यूएसी प्रमुख प्रा. विशाल पाठक,पदव्युत्तर समन्वयीका डाॅ. मयुरी सरसर, प्रोजेक्ट काॅम्पीटिशनचे समन्वयक संतोष शिंदे, समन्वयक मुक्तार, एम.एस्सी द्वितीय वर्ष वर्गप्रमुख रक्षंदा करकरे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच कळका नगरीचे भुमिपत्र मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मारोतराव पाटील गायकवाड साहेब यांनी सचिन गायकवाड यांचे अभिनंदन करून पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्या दोघांचेही सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.