
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी वाशिम/रिसोड –
अकोला /वाशिम
शासनाने धरणग्रस्त शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने जमीन संपादन करून नोकरी करता प्रमाणपत्र देण्यात आले नोकरी नाही मोबदला नाही सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना शासकीय योजनेतून ना कोणता लाभ काहीच न मिळाल्यामुळे निराश झालेल्या बेरोजगार प्रकल्पग्रस्त थेट नियुक्ती मागणी केली आहे
.
देश व राज्य सुजलाम सुफलाम करण्याकरिता राज्यातील बेरोजगार प्रकल्पग्रस्त साडेतीन लाख तर
अकोला वाशिम जिल्ह्यातील बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची संख्या ही पाच हजाराच्या वर झालेले आहे परंतु शासनाने वर्ग तीन व वर्ग चार मध्ये प्रकल्पग्रस्त संघटनेच्या नोकरी विषयक भरती प्रक्रिया करता कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही करिता शासनाच्या पाच टक्के आरक्षणात बेरोजगार प्रकल्पग्रस्तांचे वयोमर्यादा संपुष्टात येत असून अत्यंत हालकीचे जिवन जगत आहे.
प्रकल्पग्रस्तांनी आपल्या शेत, जमीन, घरदार, राष्ट्र राज्य शेत जमीन नोकरीच्या बदल्यात देण्यात आली होती वर्ग 3 वर्ग 4 पदावर नोकरी करता थेट भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशी मागणी अकोला जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. यांच्या प्रति मंत्रालय मुंख्यमंत्री याकडे सुध्दा पाठवल्या आहेत संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष संजय धनाडे, यांच्या मार्गदर्शनात अकोला जिल्हाध्यक्ष आशिष सुर्वे,
बार्शी टाकळी तालुका अध्यक्ष उमेश जाधव श्रीराम लोखंडे एकनाथ आंधळे, विजयराव चव्हाण, वाशिम जिल्हा प्रसिद्ध प्रमुख व रिसोड तालुका अध्यक्ष बद्रीनारायण घुगे बेरोजगार संघटनेचे महाराष्ट्र मार्गदर्शक दीपक राव रौनक तायडे, बाबु गवई, संदीप पाटील, गजानन मिरजकर, हरीश कंटाळे, विनोद सदाफळे, श्रीराम लोखंडे भागवत पवार प्रकल्पग्रस्त उपस्थित होते