
दैनिक चालु वार्ता शिरूर प्रतिनिधी -इंद्रभान ओव्हाळ
शिरूर (पुणे)
शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक २३ मार्च रोजी बाजार मस्जिद,शिरूर येथे रमजान महिन्याच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाकरिता रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर इफ्तार पार्टी करिता शिरूर शहरामधील प्रतिष्ठित नागरिक माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , मौलाना कैसर ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , माधव सेनेचे रवींद्र सानप ,अल बैतुल माल कमिटीचे फिरोजभाई बागवान ,भाजपाचे प्रवीण मुथा , प्रवासी संघाचे अनिल बांडे , बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड , मनसेचे शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे , आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , शशिकला काळे ,उद्योजिका सविता बोरुडे , खिदमत फाउंडैशनचे मुश्ताक शेख , शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड , राजेंद्र खेतमळीस ,गोपीनाथ पठारे , फिरोज शिकलगार , शिवाजी औटी ,शिरूर पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार आदी उपस्थित होते.
तसेच नुकताच नागपूर येथे झालेला हिंसाचार घटनेच्या अनुषंगाने सदर इफ्तार पार्टीमध्ये जातीय सलोखा राहावा.तसेच दोन समाजात भाईचारा राहण्याचा दृष्टीने सातत्याने शिरूर पोलीस स्टेशन च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.शिरूर पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की शिरुर शहराची सलोख्याची व एकोप्याची परंपरा अबाधित राहण्यासाठी कटिबध्द राहूया.तसेच रोजे हे सर्वाना शांतीचा माणूसकीचा संदेश देतात.