
दैनिक चालु वार्ता अहमदपुर तालुका प्रतिनिधी -श्री हाणमंत जी सोमवारे
====================
लातूर(अहमदपुर):- तालुक्यातील मुख्य शहरातील शिवाजी चौक अहमदपुर येथे शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लोमटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रा. विश्वंभर स्वामी,जगद्गुरु तुकोबाराय प्रबोधन प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.मारोती बुद्रुक पाटील,डॉ.ऋषिकेश पाटील पत्रकार दिनकर मद्यवाड, यादव,रवी महाजन प्रदेश अध्यक्ष भगतसिंग ग्रुप,अभय मिरकले,राजूभाऊ रेड्डी,सोमनाथ भाऊ पूणे, मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्याधिकारी संतोष लोमटे म्हणाले की शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या क्रांतिकारक विचाराबद्दल आणि दिलेल्या बलिदानाबद्दल देश त्यांना कधीच विसरू शकत नाही क्रांतीकारकांचे विचार व त्यांचा इतिहास अगदी मोजक्या शब्दात त्यांनी मांडला प्रतिष्ठाने आजवर केलेल्या कार्याचा गौरव करून अशी सामाजिक प्रतिष्ठानेच समाजाला योग्य दिशा देऊ शकतात आज आशा प्रतिष्ठानची देशाला गरज असल्याचेही म्हणाले यापुढेही असे सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या व राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करावे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रा.विश्वंभर स्वामी व प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करून शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठाने केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून निष्प्रह भावनेने प्रतिष्ठान काम करीत असल्याचे सांगितले.
हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचे देवानंद गोरे, सुरेंद्र बेंबडे,सुनील सुरकुटे,महालिंग पूणे अंगद जाधव, सचिन पाटील,अरूण मामा चोले, संतोष काडवादे,गोविंद गुडे,अनंत पंडगे,पंकज पांचाळ,अक्षय गुट्टे,प्रशांत स्वामी,शिवकुमार बेंद्रे भागवत सुर्यवंशी,परशुराम सुरनर,वैजनाथ होनराव ,प्रताप गवळी,रोहन बिराजदार,प्रशांत पांचाळ,भुषण कांबळे,नवनाथ पुणे,वसंत शिंदे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यशस्वी परिश्रम घेतले आहे.