
दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी-विजयकुमार चिंतावार
भोकर / नांदेड :-
तालुक्यातील बोरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत होणारी विविध योजनेतील कामे ही अतिशय निकृष्ट व निमबाह्य पद्धतीने होत असल्याची तक्रार चक्क त्याच ग्राम पंचायत चे उपसरपंच सुदाम कोठुळे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व गटविकास अधिकारी पंचायत समिती भोकर यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की ग्रामपंचायत कार्यालय बोरवाडी अंतर्गत २०२४ – २०२५ मधील विशेष निधी योजनेअंतर्गत होत असलेल्या स्मशानभूमी कडील रस्ता हा कुठल्याही प्रकारचे खोदकाम न करता व सोलिंग न वापरता, चुरी व हलक्या दर्जाचे सिमेंट वापरून केला जात आहे. होत असलेला रस्ता हा एका नाल्यावरून जात असल्याने सदरील रस्त्यामध्ये पाणी जाण्यासाठी सिमेंट पाईप टाकणे आवश्यक होते तसे केले नसल्याने होणारा रस्ता हा पावसामुळे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे होणारी ही कामे ही अभियंत्यांला हाताशी धरून स्व:हीता पोटी चुकीच्या पद्धतीने अंदाजपत्रक तयार करून करण्यात येत आहेत. नोव्हेंबर २०२३ ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत ची कुठलेही मंजुर कामे करण्यात येऊ नये असा ठराव २४ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेला असतांना देखील ग्रामसेवक व संबंधीत गुत्तेदार यांनी एकाही सदस्यांना विश्वासात न घेता निकृष्ट दर्जाचे कामे करुन शासनाच्या निधीचा दुरुपयोग केला जात असुन संबंधित सर्व कामांची चौकशी करुन कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात त्याच ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुदाम कोठुळे यांनी केली आहे.
बोरवाडी ग्रामपंचायत अंतर्गत निकृष्ट दर्जाचे कामे होत असल्याची तक्रार माझ्याकडे आली असुन.
मी तक्रारी च्या अनुषंगाने विस्तार अधिकारी यांना चौकशी कामी पत्र काढले असुन चौकशी आहवाल माझ्याकडे आल्या नंतर पुढील कार्यवाही होईल.
एम. एन. केंद्रे
गटविकास अधिकारी
पंचायत समिती भोकर.