
सभागृहात खोटी माहिती ?
राज्याच्या आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी दाखल हा हक्कभंग दाखल केला असून बुलढाण्यात लोकांना टक्कल पडण्याच्या विषयावर विधानपरिषदेत खोटी माहिती दिल्याप्रकरणी हक्क भंग दाखल करण्यात आलाय.
विधानपरिषद सभापती राम शिंदे यांनी हक्कभंग दाखल करून घेतलाय.
बुलढाणा केसगळतीवरून मेघना बोर्डीकरांवर हक्कभंग
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यासह नांदुरा तालुक्यात नागरिकांना आकस्मिक केसगळती सुरु झाली आणि टक्कल पडण्याच्या आजाराने ते ग्रासले. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ही केसगळती रेशनच्या गव्हामुळे झाली नसून पाण्यामुळे झाल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डिकर यांनी दिली होती. रेशनवर मिळणा-या गव्हामधील सेलेनियममुळे लोकांचे केस गळत असल्याचे संशोधन पद्मश्री डॉ हिम्मतराव बाविस्कर यांनी संशोधन केले आहे .पण मंत्री मेघना बोर्डीकर यांनी मात्र गव्हातील सेलेनियममुळे केस गळती होत नाही अशी माहिती सभागृहाला दिली. सभागृहाला चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्यामुळे काँग्रेस आमदार धीरज लिंगाडे यांनी दाखल केला हक्कभंग दाखल करण्यात आलाय.
रेशनच्या गव्हामुळे केसगळती ?
याप्रकरणी डॉ हिम्मतराव बाविस्कर यांनी केलेल्या संशोधनानुसार बुलढाण्यातील केस गळती प्रकरणाचा संबंध थेट पंजाब हरियाणााशी जोडला गेला. बुलढाण्यातील गावातील लोकांनी खाल्लेल्या रेशनच्या गहूमुळे हे झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. या गहूमध्ये सेलेनियमसारखा घटक मोठ्या प्रमाणात आढळला आहे आणि हा घटक शरीरात गेल्याने ही केस गळती झाल्याचा आरोप डॉ. बावस्कर यांनी केला हेाता. गहू पंजाब आणि हरियाणाच्या शिवालिक टेकड्यांमधून आला आहे. या गव्हाच्या पिकाने दगडातील सेलेनियम हा घटक शोषून घेतला. हाच गहू रेशनच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात वाटप झाल्याचा दावा संशोधक हिम्मतराव बावस्कर यांनी केला होता.