
दैनिक चालु वार्ता धाराशिव प्रतिनिधी -समीर मुल्ला
धाराशिव/ कळंब
कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील अमोल नाना काळे रा. कन्हेरवाडी पाटी ता.कळंब व तानाजी हरी काळे रा. ईटकुर ता.कळंब यांच्यावर कायद्याचा कोणताही धाक नव्हता त्यांना वाटेल तेव्हा कायदा हातात घेउन विविध प्रकारचे गुन्हे करत होते म्हणून पोलीस स्टेशन कळंब येथे वेगवेगळया कलमान्वये गुन्हे दाखल होते. त्यामुळे परिसरात व सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते गुन्हेगारांची गुन्हा करण्याची प्रवृत्ती वाढल्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्रास होत होता. गुन्हेगारांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याकरिता म्हणून त्यांच्यावर कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत मा. उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग कळंब,यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव दाखल करण्यात आलेला होता.त्या अनुषंगाने मा.संजय पाटील उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग कळंब यांनी त्यांना धाराशिव जिल्ह्यातून पुढील तीन महिन्याकरिता हद्दपार करण्यात आलेले आहे या आदेशात असे म्हटले आहे मुंबई पोलीस अधिनियम कलम 56 अन्वये विविध केलेल्या शक्तीचा वापर करून उपविभागीय दंडाधिकारी मा.संजय पाटील या आदेशाच्या तारखेपासून दोन दिवसाच्या आत रेल्वे/रस्ते मार्गाने धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून निघून जाईल किंवा त्याला घालवून दिले जाईल व त्या तारखेपासून तीन महिने धाराशिव जिल्ह्याच्या क्षेत्रात यांनी उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग कळंब महाराष्ट्र शासनाच्या परवानगी शिवाय प्रवेश करू नये व परत येऊ नये व पुढे आदेशाच्या कालावधीत राज्यात इतरत्र राहील तेथील नजीकच्या पोलीस स्टेशनला त्यांनी महिन्यातून एकदा त्याने राहण्याचे ठिकाण संपूर्ण पत्ता व त्यात बदल झाला की नाही ही माहिती द्यावी व महाराष्ट्र राज्याबाहेर निघून जाण्याच्या दहा दिवसाच्या आत संबंधित पोलीस स्टेशनला माहिती पोस्टाने व इतर मार्गाने दिली पाहिजे व महाराष्ट्र राज्यात आल्यानंतर दहा दिवसाच्या आत राहत असलेल्या भागाचे नजीकच्या पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे असे आदेशात नमूद करण्यात आले आहे तसेच आणखी पाच गून्हेगारांनाही मा. संजय पवार उपविभागीय पोलीस अधिकारी,उपविभाग कळंब यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दपार करण्यात येणार आहे.त्यामुळे इतर गुन्हेगारावरती याचा नक्कीच परिणाम होऊन गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसू शकतो,असे कळंब पोलीस निरीक्षक श्री.रवी सानप यांनी सांगितले.